मातंग समाजाची नाराजी प्रस्थापित पक्षांना पडणार महागात – भाऊसाहेब अडागळे
पुणे : मातंग समाजाने काँग्रेस .भाजपा ,राष्ट्रवादी ,शिवसेना अशाच सर्चच पक्षासांसाठी पिढ्यानपिढ्या काम केले आहे ,पण गरीब असणाऱ्या आणि आगाऊ नसणाऱ्या भावावर जसा अन्याय होतो तसा मातंग समाजावर अन्याय होत आहे पण या लोकसभा निवडणुकित सर्व पक्ष ,संघटना च्या कार्यकर्त्यांनी आता यांना मातंग समाजाची ताकत दाखवून देण्याचे आवाहन मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडगाळे
यांनी केले आहे .
महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जातीची लोकसंख्येनुसार मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे .पण हा समाज सर्व पक्षाशी प्रामनीक राहूनही या समाजाला दुय्यम वागणूक मिळत आहे .म्हणून सर्व पक्ष संघटनांनी या प्रस्तावित पक्षावर बहिष्कार घालून नवा पर्यायाचा विचार करण्याचे आवाहन मातंग समाजाचे जेष्ठ सामाजिक नेते भाऊसाहेब आडगळे यांनी केले आहे .
लातूर मध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे ,अमरावती ,शिर्डी याठिकाणी या समाजाची संख्या मोठ्या प्रमानात आहे . लातूरमधून माजी आमदार टी.एन.कांबळे शिवाय सोलापूरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यासह आणखी मातंग समाजाचे अनेक नेते इच्छुक होते परंतु जो समाज भाजपा बरोबर प्रामाणिकपणे राहतो त्या समजाला न्याय एनए देता ज्यांची काहीच संख्या नाही अशा लोकांना संधी देऊन मातंग समाजाला पूर्ण दुर्लक्षित केले आहे .राज्यात सर्वाधिक लोकसंख्या मातंग समाजाची आहे . परंतु या ठिकाणी मातंग समाजाला भाजपने शेवटपर्यत खेळवत ठेवले व मातंग समाजाच्या अस्मितेशी आणि भावनेशी खेळ करुन अपमानित केले आहे त्यामुळे या पक्षांना धडा शिकवण्यासाठी लवकरच मातंग समाजातील सर्व पक्ष आणि संघटना यांची राज्यव्यापी बैठक आयोजीत करणार असून यावर समाज योग्य तो निर्णय जाहीर करणार असल्याचे अडागळे यांनी सांगितले आहे .त्यामुळे महाराष्टातील मातंग समाजाणे आता एकत्र येऊन आपली ताकत मोठ्या प्रमाणात दाखवण्याचे आवाहन अडागळे यांनी केले आहे .
