पीडीसीसी जिल्हा खुल्या पुरुष व महिला निवड बुद्धीबळ स्पर्धेत खुल्या गटात चौथ्या फेरीअखेर आठ खेळाडू संयुक्तरीत्या आघाडीवर
पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल (पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीडीसीसी जिल्हा खुल्या पुरुष व महिला निवड बुद्धीबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर खुल्या गटात अविरत चौहान, गौरव झगडे, आदित्य गद्रे, विरेश शरणार्थी, अभिजीत जोशी, प्रथमेश शेरला,ओम लामकाने, अद्विक अगरवाल यांनी 4 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.
कर्वे रोड येथील अश्वमेध हॉल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चौथ्या फेरीत खुल्या गटात 1777रेटिंग असलेल्या अविरत चौहानने 2106 रेटिंग असलेल्या गौरव बाक्लीवालचा पराभव करून 4गुण प्राप्त केले. तर, गौरव झगडेने शेजल संजयचा, आदित्य गद्रेने शंतनु मिराशीचा पराभव करून 4 गुण मिळवले.
विरेश शरणार्थीने अर्णव कदमवर विजय मिळवत 4गुणांची कमाई केली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेत्या ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे आणि पीडीसीसीचे खजिनदार चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयए राजेंद्र शिदोरे चीफ आरबीटर, डेप्युटी चीफ आरबीटर श्रद्धा विंचवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: खुला गट: चौथी फेरी:
गौरव बाक्लीवाल(3गुण) पराभुत वि.अविरत चौहान (4गुण);
गौरव झगडे (4गुण)वि.वि.शेजल संजय(3गुण);
आदित्य गद्रे(4गुण) वि.वि.शंतनु मिराशी(3गुण);
विरेश शरणार्थी(4गुण)वि.वि.अर्णव कदम(3गुण);
अभिजीत जोशी(4गुण)वि.वि.केविन डिसुझा(3गुण);
प्रथमेश शेरला(4गुण) वि.वि.आरव धायगुडे(3गुण);
ओम लामकाने (4गुण) वि.वि.युग बरादिया (3गुण);
अद्विक अगरवाल(4गुण) वि.वि.बुमीनाथन ललितादित्ययार (3गुण);
गणेश अंताड (3गुण)पराभुत वि. संदीप गोहड (3.5गुण);
महिला गट: चौथी फेरी:
मृण्मयी बागवे(3.5गुण)वि.वि.राजराजेश् वरी देशमुख(3गुण);
अनुष्का कुतवळ(3.5गुण) वि.वि.श्रावणी उंडाळे (2.5गुण);
प्रतिती खंडेलवाल(3.5गुण) वि.वि.चतुर्थी परदेशी(2.5गुण);
स्लेशा मडकैकर (2गुण)पराभुत वि. तन्वी कुलकर्णी(3गुण);
रिया मराठे(3गुण)वि.वि.आर समृध्दी(2गुण);
ताशवी वर्तक(2गुण)पराभुत वि. मानसी टिळेकर(3गुण);
श्रावी बाक्लीवाल(2गुण) बरोबरी वि. मेहक कटारिया(2गुण);
अविलीप्सा कुनर(2.5गुण) वि.वि.श्रेया जोशी(1.5गुण);
संजना सावंत(2गुण)वि.वि.सचिन शाळवे (1.5गुण).
