Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध विज्ञान विषयक उपक्रम

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आली. याप्रसंगी सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.राधिका देशपांडे यांनी लिहिलेल्या व हर्षद गाडगीळ यांनी संगीतबद्ध केलेल्या

‘शास्त्रज्ञ भरतभूचे,भाग्य थोर आमुचे
विज्ञानवाट त्यांची,आम्हीही चालणार’ या विज्ञान गीताचे गायन विद्यार्थ्यांनी केले.डॉ. प्रशांत दुराफे( क्रोनो बायोलॉजिस्ट) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रशालेच्या शालाप्रमुख मा.सौ.मनिषा मिनोचा यांनी अध्यक्षीय भाषणातून जिज्ञासा जागृत ठेवून विद्यार्थ्यांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा असे विद्यार्थ्यांना सांगितले.विज्ञान विभाग प्रमुख प्रतिभा जक्का यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विज्ञान मंडळ प्रमुख राधिका देशपांडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला.हेमंत पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी देशपांडे यांनी केले.
विज्ञान दिनाप्रित्यर्थ संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये विज्ञान विषयक पुढील उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्व विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आले.अग्निशामक दलाचे श्री.गजानन पाथ्रूडकर (पुणे महानगरपालिका अग्निशामक विभाग) यांची आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिके,प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीजीत जाधव यांनी प्रशालेस भेट दिलेल्या दिलेल्या टेलिस्कोपद्वारे आकाश निरीक्षण ,सायबर सिक्युरिटी व फॉरेन्सिक’ या विषयावर श्री.हेमंत देशमुख यांचे व्याख्यान,ई कचरा व प्लास्टिक संकलन अभियान यावर श्री.राजेश मनेरीकर यांचे व्याख्यान.सौर उर्जेवर चालणारी उपकरणे या विषयावर श्री.दिलीप कुलकर्णी यांची विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा,लेंड ए हॅन्ड इंडियामार्फत ‘स्किल्स ओन व्हील’ उपक्रमाअंतर्गत कौशल्याधिष्ठित शिक्षण,प्रकाश प्रवहन दिन,फर्ग्युसन कॉलेजच्या बॉटनिकल गार्डनला क्षेत्रभेट, वैज्ञानिक फॅन्सी ड्रेस स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,बॅजेस तयार करणे स्पर्धा, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन इत्यादी. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री सुरेश वरगंटीवार,जयंत टोले,उषादेवी भोसले यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन लाभले.शिक्षक शिक्षकेतर
विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading