Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवा.आनंदराज आंबेडकर

 

कुलगुरूंची भेट घेऊन केल्या विविध सूचना

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  आनंदराज आंबेडकर यांनी आज कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांची भेट घेऊन कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी काम करा आंबेडकरी कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील, विद्यार्थ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागते या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्यापेक्षा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या साठी प्रयत्न व्हावेत असे त्यांनी सुचविले.
भीमटोला आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांवर त्यांनी चर्चा घडवून आणत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाने काम करावे विद्यापीठाचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत या बाबत सूचना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांपैकी उस्मानाबाद उपकेंद्र येथे विद्यापीठाच्या गेट ची भव्य प्रतिकृती उभारणे, विद्यापीठात अद्ययावत ग्रंथ, पुस्तके उपलब्ध करून देणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीचे रखडलेले उदघाटन, मुलींसाठी कॉमन लेडीज रूम, आरोग्य केंद्रात पूर्णवेळ महिला डॉक्टर ची नियुक्ती, तपासण्या करण्यासाठी तंत्रज्ञ,विद्यापीठ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय, इंद्रधनुष्य व युवक महोत्सवात होणारा निकृष्ट भोजन पुरवठा अश्या महत्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही कुलगुरूंनी दिली.
यावेळी सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, जयश्री शिर्के, दिक्षा पवार, लोकेश कांबळे, अतुल कांबळे, विकास रोडे, जयपाल सुकाळे,प्रतीक बोर्डे,चंद्रकांत रुपेकर, सिद्धोधन मोरे, अस्कर खान, मिलिंद बनसोडे आदींसह विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading