Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

 

पुणे : कविवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स आणि भारतीय विचार साधना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने आजच्या दिवसाचे निमित्त साधून मराठी पुस्तक वाचनाचा संकल्प केला पाहिजे असे आवाहन यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. भारतीय विचारसाधना फाउंडेशनचे अध्यक्ष बिपीन पाटसकर यांच्या मार्गदर्शनानुसार वाचनाचा चालता फिरता आनंद अनुभवता यावा यासाठी पुस्तकांची गाडी या प्रदर्शन स्थळी उभारण्यात आली होती. अशा प्रकारच्या उपक्रमातून वाचनीयता वाढीस लागते,असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारतीय विचार साधना फाउंडेशनचे संचालक अनिरुद्ध गोगटे यांनी व्यक्त केले.

यावेळी विचार यात्रा व्यवस्थापक पवन रेंगे,अमित दळवी, यशस्वी संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे आदी उपस्थित होते. अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सातत्याने असे उपक्रम आयोजित व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading