थायलैंड येथील बुद्धरूप (मूर्तीचे) २५ फेब्रुवारीला भव्य वितरण
पुणेः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्याश्रम पुणे येथे गगन मलिक फाउंडेशन द्वारा थायलैंड येथून प्राप्त सहा फुटाच्या पंचधातूंच्या २५ बुद्धरूप (मूर्तींचा) भव्य वितरण सोहळा व बुद्ध भीम गीतांचा स्वर संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
गगन मलिक फाउंडेशन, पद्मभूमी फाउंडेशन,वेसाक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होणार असल्याचे चंद्रशेखर जावळे यांनी सांगितले,
गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने सम्राट अशोक यांच्या धम्मचक्र प्रवर्तन व धम्म प्रसार व प्रचार विचारांना अनुसरून ८४ हजार बुद्ध मूर्ती वितरण या अभियानाचा एक भाग म्हणून थायलंड येथील सहा फुटी उंचीच्या पंचवीस बुद्ध रूपांचे वितरण पुण्यात होत आहे,
बुद्धम् शरणम् गच्छामि… धम्मम शरणंम् गच्छामि.. संघम् शरणंम् गच्छामिच्या स्वरात मंगल मैत्रीची कामना करत भिकू संघ, श्रामणेर संघ आणि शुभ्रवस्त्र परिधान केलेले उपासक – उपासिका या सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत,
उपासक विशाल शेवाळे,लताताई राजगुरू, शांतीपाल ओव्हाळ, डॉ.प्रशांत पगारे, मिलिंद गायकवाड, शिवसेना नगरसेविका पल्लवी जावळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर पुणेकर नागरिक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय निवेदक दीपकराज म्हस्के हे करणार असल्याची माहिती भदंत आनंद धम्मसेवक असित गांगुर्डे, चंद्रशेखर जावळे यांनी दिली.
सदर सोहळा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता, अहिल्याश्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नाना पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
