Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘भाबीजी घर पर है’च्‍या सेटवर आसिफ आणि शुभांगी यांची ‘पान पार्टी’

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’ने विनोदी व धमाल कथानकासह सतत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्‍येक वेळी पात्र विनोदी स्थितींमध्‍ये अडकून जातात, जे पाहून प्रेक्षक हसून-हसून लोटपोट होतात. लवकरच, प्रेक्षकांना अद्वितीय हास्‍याचा आनंद मिळणार आहे, जेथे विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणि अंगूरी भाबी (शुभांगी अत्रे) यांना ‘पान’ खाण्‍याची सवय लागते, ज्‍यामुळे मॉडर्न कॉलनीमध्‍ये विनोदी घटना घडू लागतात. या सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करताना कलाकारांना त्‍यांचे तोंड लाल रंगाचे ठेवावे लागले, ज्‍यासाठी ते सतत विविध प्रकारचे पान चघळत होते. परिणामत: मालिकेच्‍या सेटवर ‘पान पार्टी’ सुरू असल्‍यासारखे वाटले.
‘पान खायें सैयां’ एपिसोडबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत आसिफ शेख म्‍हणाले, ”आम्‍ही नेहमी धमाल व विनोदी कथानकांच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना आनंद देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आगामी एपिसोडमध्‍ये विभुतीला पान खाण्‍याची सवय लागते, जे पाहून अंगूरी (शुभांगी अत्रे) देखील त्‍याच्‍यासोबत पान खायला सुरूवात करते. हे पाहून त्‍यांचे जोडीदार अनिता (विदिशा श्रीवास्‍तव) आणि तिवारी (रोहिताश्‍व गौड) यांना मनस्‍ताप होतो. ते सर्वत्र थुंकण्‍यास सुरूवात करतात, ज्‍यामुळे मॉडर्न कॉलनीमध्‍ये गोंधळाची स्थिती निर्माण होतो. हा गोंधळ असताना देखील या सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करताना खूप धमाल आली. असे काही क्षण होते, जेथे आमच्‍या पात्रांना लाल रंगामध्‍ये तोंड व दात दाखवावे लागले. संपूर्ण सीनदरम्‍यान शुभांगी आणि मी आमच्या पात्रांमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी खूप पान खाल्‍ले. असे तर मला पान खायला आवडत नाही, पण सेटवर मी ते टाळू शकलो नाही. रोचक बाब म्‍हणजे मालिकेमध्‍ये पान खाण्‍याच्‍या या सवयीने मला देखील पान खायला आवडू लागले आणि मी पुढे देखील पान खायला कोणताच संकोच करणार नाही. मी लवकरच वाराणसीला जाणार आहे, जे बनारसी पानासाठी खूप प्रसिद्ध आहे. मी या भेटीदरम्‍यान बनारसी पान खाण्‍यास खूप उत्‍सुक आहे.” शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”आमच्‍या दिग्‍दर्शकांनी आम्‍हाला दिवसभर शूटिंगदरम्‍यान आमचे तोंड लाल ठेवण्‍यास सांगितले, तेव्‍हा सुरूवातीला मी काहीशी संकोचले. पण लवकरच मी माझ्या हातामध्‍ये पान धरले आणि त्‍या पानाच्‍या स्‍वादामध्‍ये दंग होऊन गेले. इंदौरमध्‍ये असताना मी माझ्या मैत्रिणींसोबत पान, विशेषत: गोड पान खायचे. म्‍हणून मी आमच्‍या टीमला त्‍याच अनुभवांना पुन्‍हा सादर करण्‍याची विनवणी केली. पान खाताना मला गोड गुलकंद, स्‍पाइसेस व बडीशेप यांचा आस्‍वाद मिळाला. सुपारीमुळे पानाची चव अधिक स्‍वादिष्‍ट झाली होती. त्‍यामध्‍ये फ्लेवर्सचे अद्वितीय स्‍वाद होते, ज्‍यामुळे जुन्‍या आठवणी जागृत झाल्‍या. आसिफ जी (विभुती नारायण मिश्रा) आणि मी पानाचा आस्‍वाद घेण्‍यासोबत आशा भोसलेजींचे सदाबहार बॉलिवुड गाणे ‘पान खाये सैयां हमारो’वर नृत्‍य करत खूप धमाल केली. आम्‍ही नेहमी नवीन, धमाल कन्‍टेन्‍टच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, तसेच अद्भुत कथानक आणि मनोरंजनपूर्ण पात्रांचा आनंद देतो. मी आशा करते की, आम्‍ही या सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करताना जितकी धमाल केली तितकेच प्रेक्षक हा एपिसोड पाहण्‍याचा आनंद घेतील.”
पुढील आठवड्यात धमाल ‘पान खाये सैयां’ एपिसोड पाहायला विसरू नका आणि पाहत राहा ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading