Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

मसाप दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर 

पुणे :  महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या  दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.  ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा’ पुरस्कार ‘हंस’ या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. रु. ५१०००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कार तीन विभागातील अंकांना जाहीर झाले असून ‘बालकुमार’ दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘वयम’ या दिवाळी अंकाला, एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘किल्ला’ या दिवाळी अंकाला तर इतर विभागातील पुरस्कार ‘चांगुलपणाची चळवळ’ या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी रु. १५००० आणि सन्मानपत्र असे उत्कृष्ट दिवाळी अंकांसाठीच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार सोमवार, दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर आणि ख्यातनाम अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. पुण्यभूषण  फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी रेखा साने इनामदार, ल. म. कडू, राजीव तांबे, संगीता बर्वे, संजय भास्कर जोशी, वृषाली दाभोळकर, महेंद्र मुंजाळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading