Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

पोवाडयातून केला शिवकार्याचा जागर     

पुणे : शिवाजीनगर भागातील विविध वस्त्यामध्ये पोवाडा सादरी करणाद्वारे शिवाजी महाराजांचा कार्याचा जागर करण्यात आला. शिवजयंती निमित्त लोकायतने १७ ,१८ ,१९ फेब्रुवारीला सलग ३ दिवस संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत हा उपक्रम केला. शेतकऱ्यांच्या रयतेच्या कल्याणाची धोरणे, धार्मिक सद्भाव जपणारे, आयाबहिणींचे कैवारी याबाबतचे दाखले पोवाडा द्वारे सांगण्यात आले.
भेदाभेद भ्रम अमंगळ हा संत तुकाराम महाराजांचा समतेचा संदेश शिवरायांनी शिरोधर्य मानला तसेच सर्व जाती धर्माचा आदर करत रयतेचे राज्य चालवले हा शिवाजींचा खरा इतिहास आहे त्याच्या कार्याचा जागर करण या उद्देशानेच हा उपक्रम राबविण्यात आला असे उपक्रमाचे समन्वयक ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे दाखले देणारे पत्रकही यावेळी देण्यात आले.
वतनदार ते रयतेवरती करीत होते मनमानी, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, शूरावामंदी शूराची गाथा वाचे मी बावळा हे पोवाडे सादर करण्यात आले. ना जातीचे ना धर्माचे शिवाजी राजे रयतेचे, शिवबाचा इतिहास सर्वांना सांगणार अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. वस्तीतील नागरिकांचा या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading