हॅरी स्टाइल्स, सोनम कपूर, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस यूके’च्या टॉप 40 बेस्ट ड्रेसमध्ये!
सोनम कपूर ही एक जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन आहे, सोनम ला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून संबोधतात. तिने एकटीने भारतातील फॅशनला फोकसमध्ये आणले आहे आणि सर्व प्रमुख जागतिक फॅशन आणि लक्झरी ब्रँड्ससह तिचा जबरदस्त प्रभाव आंतरराष्ट्रीय मीडियाने वारंवार मान्य केला आहे!
काल रात्री, यूकेच्या प्रतिष्ठित मीडिया हाऊस द स्टँडर्डने सोनम कपूरला यूकेच्या टॉप ४० सर्वोत्कृष्ट ड्रेस्ड लोकांपैकी एक म्हणून गौरवले! ती यूके फॅशनमधील काही प्रतिष्ठित नावांमध्ये होती ज्यांनी मोठा जागतिक प्रभाव पाडला आहे.
सोनम, हॅरी स्टाइल्स, केट मिडलटन, रोसामुंड पाईक, केट मॉस, सिएना मिलर, बियान्का जॅगर, अलेक्सा चुंग, स्टॉर्मझी, नाओमी कॅम्पबेल, एडवर्ड एनिनफुल, स्टेला मॅककार्टनी, फोबी फिलो, अक्षता मूर्ती (व्यावसायिक आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी) व्यतिरिक्त, इतरांसह टॉप 40 यादीत स्थान मिळाले!
सोनमच्या बद्दल द स्टँडर्डने लिहिले, “बॉलिवुड सेन्सेशन ही एक नॉटिंग हिल गर्ल आहे आणि कॉउचर सर्किटची आंतरराष्ट्रीय फिक्स्चर आहे – डायर आणि व्हॅलेंटिनोच्या टॉप क्लायंटपैकी एक आहे.”
अलीकडे, जागतिक फॅशन अहवालानुसार, सोनम झेंडया, काइली जेनर, केंडल जेनर, ब्लॅकपिंक, बीटीएस इत्यादी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये होती ज्यांनी 2023 मध्ये लक्झरी फॅशन ब्रँडसाठी सर्वाधिक प्रभाव टाकला होता!
कामाच्या आघाडीवर, सोनमकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत, एक बैटल ऑफ़ बिटोरा आणि इतर दुसऱ्या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही।
