Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNESports

२३ हजार सूर्यनमस्कार घालीत पुणेकरांनी साजरी केली रथसप्तमी

पुणे : आपल्या संस्कृतीत मानाचे स्थान असलेली रथसप्तमी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासोबतच योग आणि सूर्यनमस्कार यांबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने पुण्यातील सोलॅरिस क्लब आणि योगविश्व स्टुडीओ यांच्या वतीने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मयूर कॉलनी येथील सोलॅरिस क्लब येथे हा उपक्रम संपन्न झाला.

योगविश्व स्टुडीओच्या निखील दीक्षित यांची ही संकल्पना असून या अंतर्गत रथसप्तमी (१६ फेब्रुवारी) रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत २०० हून अधिक पुणेकरांनी तब्बल २३ हजार सूर्यनमस्कार घातले. यामध्ये स्वत: निखील दीक्षित यांनी न थांबता १६५६ सूर्यनमस्कार घालत एक वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवला.

याविषयी अधिक माहिती देताना निखील दीक्षित म्हणाले, “वैदिक परंपरेत आपल्याला सूर्यउपासनेचे महत्त्व विषद केलेले दिसते. या शुभ दिवशी सूर्याची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. सूर्यनमस्कार हा सूर्यउपासनेचा सर्वात सोपा आणि सर्वांगीण प्रकार असून याद्वारे असंख्य आजार बरे होतात शिवाय शारीरिक आरोग्यही चांगले होते. त्यामुळे सूर्यउपासना आणि सूर्यनमस्कार यांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे.”

या उपक्रमात विविध वयोगटातील तब्बल २०० हून अधिक नागरीकांनी वेगवेगळ्या वेळी सहभागी होत तब्बल २३ हजार  सूर्यनमस्कार घातले. यामध्ये अगदी १२ सूर्यनमस्कारांपासून, २४, ६०, १०८, ५०० आणि १००० सूर्यनमस्कार घालत नागरीकांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमाच्या समारोपा प्रसंगी जोहानस पवार आणि ह्दयरोग तज्ज्ञ डॉ रितुपर्ण शिंदे यांनी उपस्थित राहत सहभागी झालेल्यांचा विशेष सत्कार केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading