Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNE

बंजारा सेवा संघ मावळ यांच्यावतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


पिंपरी  : बंजारा सेवा संघ मावळ यांच्यावतीने संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तळेगाव नगरपरिषद व तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ या ठिकाणी शासकीय जयंती साजरी करण्यात आली.
जिजामाता चौक येथून संत सेवालाल महाराजांची पगडी घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजामाता मंदिरात पूजा करून मिरवणूक लिंब फाट्याकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीत महिला व पुरुषांनी सेवालाल महाराजांचे स्मरण करीत फेर धरले होते. ही मिरवणूक वैशाली मंगल कार्यालय येथे समाप्त झाली.
दरम्यान, संत सेवालाल महाराजांची जयंती व बंजारा समाज जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाला संघटित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, समाजात चांगला संदेश देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सोमलीन महाराज, माजी नगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार, नगर परिषदेच्या उपाधिकारी ममता राठोड, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, मावळ तालुका अध्यक्ष महादेव राठोड, रामा राठोड, अर्जुन आढे, उपाध्यक्ष चंदू राठोड, देसू राठोड, शंकर पवार, जयराम चव्हाण, राजू पवार, नितीन चव्हाण, विठ्ठल राठोड, विठ्ठल जाधव, किरण राठोड, नवनाथ राठोड, विजू राठोड, अमरजीत चव्हाण, साहेबराव जाधव, विक्रम चव्हाण, वसंत राठोड, तसेच मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading