Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

सांस्कृतिक कार्यक्रमाने इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हलची सांगता

 

क्रीडा, खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाने घडले संस्कृती दर्शन

पुणे, १२ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हलची शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. या कार्यक्रमाचे उद्धाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर उपस्थित होत्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ.) विजय खरे, उपकुलसचिव श्री. प्रदिप कोळी, श्री. ज्ञानेश्वर साळुंके, श्री. प्रसाद कुळकर्णी आदी उपस्थित होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत दहा देशांचे संघ सहभागी झाले होते. कथ्थक, हिप-हॉप, बॉलीवूड डान्स, महाराष्ट्रीय लावणी, साऊथ डान्स अशा विविध प्रकारच्या नृत्यकलेची झलक यावेळी स्पर्धकांनी दाखवली. तीन भागात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या भगात बांग्लादेश, दुसऱ्या भागात इराण तर तिसऱ्या भागात साऊथ सुदानच्या संघाने विजेतेपद पटकावले. याप्रसंगी बोलताना अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी सर्व संघाना शुभेच्छा देत त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

विविध देशातील सस्कृतीची झलक दाखवणाऱ्या इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फुटबॉल स्पर्धेने या फेस्टिव्हलची सुरूवात झाली होती. या स्पर्धेत १५ देशांच्या १५ मुलांचे आणि ३ मुलींचे संघ सहभागी झाले होते. यात मुलांच्या गटात सुदानच्या संघाने तर मुलांची गटात साऊथ सुदानने विजेतेपद पटकावले. त्यानंतर झालेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये २३ देशांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी विविध देशातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. या फेस्टिव्हच्या सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading