Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

ज्योती पाबळकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

पुणे :  विद्या महामंडळ संचलित शारदा बालक विहार यांच्या वतीने देण्यात येणारा कै.सौ. शरयू आपटे स्मृती प्रित्यर्थ आदर्श शिक्षिका पुरस्कार ज्योती पाबळकर यांना प्रदान करण्यात आला.  आपटे रस्त्यावरील आपटे प्रशालेच्या चितळे सभागृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बाल अभिनय गीत गायन व बालकथा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला.  लेखिका यशश्री पुणेकर, ॲड. अभय आपटे, विद्या महामंडळचे कार्यवाहक लीलाधर गाजरे, सदस्य पवन कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.  रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा २४ वे वर्ष होते. कार्यक्रमाचे संयोजन  शारदा बालक विहारच्या मुख्याध्यापिका  शितल पवार यांनी केले होते.

बालगीत गायन स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील ८५ स्पर्धक शिक्षकांनी भाग घेतला होता तर बाल कथा लेखन स्पर्धेत ७० स्पर्धक शिक्षकांनी सहभाग घेतला होता. बाल अभिनय गीत गायन स्पर्धेत ग्रामीण भागात ग्यानबा सोपान मोझे विद्यालयाच्या माधवी मेहरे यांनी तर शहरी भागात मनीषा भिसे यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. बाल कथा लेखन स्पर्धेत मएसो बारामतीच्या लीना गायकवाड यांनी प्रथम क तर फिरती ढाल लीना देसाई यांनी पटकाविली. स्वरचित गीतासाठी छोटी फिरती ढाल ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या श्रद्धा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आली. बाल अभिनय गीत गायन स्पर्धेची फिरती ढाल एच. ए. स्कूल पिंपरीच्या लीना देसाई यांना मिळाली.

यशश्री पुणेकर म्हणाल्या, शिक्षक तळमळीने मुलांना शिकवत असतात. शाळेतल्या बाई या आई प्रमाणेच आहेत. योग्य संस्कार मुलांना देऊन संस्कारित पिढी घडवतात. विद्यार्थ्यांची भावी आयुष्यासाठी मनोभूमी तयार करतात. समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षकांच्या माध्यमातून होत असते.

ॲड. अभय आपटे म्हणाले, आदर्श शिक्षक ही स्पर्धा मागील २४ वर्षापासून घेतली जात आहे. पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक समाजातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहेत, परंतु ते दुर्लक्षित आहेत. पूर्व प्राथमिक शिक्षकांना विशेष मान्यता मिळणे आवश्यक आहे. कारण लहान वयात मुलांवर संस्कार करण्याचे काम त्या करत असतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading