Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात CROSS-X क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात CROSS-X क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागामार्फत खाशाबा जाधव क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, माजी क्रीडा संचालक डॉ. दिपक माने, विभागप्रमुख डॉ. विष्णू पेठकर, आयसीआयसीआय बँकेचे सहायक संचालक महादेवन सुंदरम व शाखा संचालक  शलाका सुपेकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुमन पांडे, सहायक प्राध्यापक डॉ. अभिजित कदम, डॉ. दादासाहेब ढेंगळे,  दिपक घोळे उपस्थित होते.

विद्यार्थ्याना साहसी खेळांसाठी प्रोत्साहन देणे, खेळाद्वारे जीवनाशी निगडीत मुल्ये उदा. एकमेकांना सहकार्य, एकसंघ भावना यासारखी मुल्ये रुजवण्यासाठी त्याचबरोबर स्वत:ची तंदुरुस्ती व दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून येणारा ताण दुर करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाने प्रथम क्रमांक, इतिहास विभागाने द्वितीय क्रमांक व वाणिज्य विभागाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच उत्कृष्ट खेळाडू MR. CROSS-X अभिषेक जाधव (सूक्ष्म जीवशास्त्र विभाग) या विद्यार्थ्याने व MS. CROSS-X दिपाली सोळुंके (वाणिज्य विभाग) या विद्यार्थिनीने हा पुरस्कार मिळवला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading