Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांची डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

पुणे : केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉ बार्ला यांनी अलीकडेच पिंपरी येथील डॉडी.वायपाटील वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालय आणि संशोधन केंद्राला भेट दिलीवैद्यकीय शिक्षणसंशोधन आणि रूग् सेवेतील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा आणि प्रगतीची संधी असणाऱ्या संभाव्य क्षेत्रांबाबत बार्ला यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आलीयावेळी बार्ला यांनीविविध महत्त्वाच्या क्षेत्रातील विशेषतकायदेशीर क्षेत्रातील आव्हानांबाबत संस्थेच्या प्रतिनिधींशी संवाद साधलारोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी ही शिक्षणसंस्था आणि सरका यांची वचनबद्धता यातून अधोरेखित होते.

या भेटीबद्दल अधिक माहिती देताना डॉडीवायपाटील विद्यापीठाचे विश्वस्त डॉयशराज पाटील म्हणाले,“आमच्या संस्थेला केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी भेट दिलीहा आमचा सन्मान आहेउत्कृष्टतेसाठी समर्पित वृत्तीने काम करताना आम्हाला येणारी आव्हाने समजून घेण्याची त्यांनी दर्शविलेली उत्सुकता प्रेरणादायी आहे. अडथळ्यांवर मात करून अपवादात्मक आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रदान करण्याची आमच्या वचनबद्धतेला यामुळे बळ मिळाले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading