Monday, June 1, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

नेत्रदीपक महानाट्याच्या रूपाने पुणेकरांसमोर उलगडला श्री बालाजीचा इतिहास


पुणे : श्री बालाजी यांचे भूलोकी आगमन, त्याच्या लीला, त्यांचा इतिहास, कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी यांच्याशी श्री बालाजी यांचे नाते… अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत आज ‘श्री बालाजी महानाट्या’च्या रूपाने पुणेकरांसमोर श्री बालाजी यांचा इतिहास उलगडला. नेत्रदीपक अशा पाच मजली भव्य रंगमंचावर सादर झालेल्या महानाट्याने उपस्थित रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

‘श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशन’च्या वतीने हे ‘ श्री बालाजी महानाट्य’ सादर करण्यात आले. या महानाट्यात तब्बल 250 हौशी कलाकार, 70 हून अधिक नृत्य कलाकार, घोडे, रोबोटिक हत्ती, आदींचा सहभाग आहे.
पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिर निर्माण निधीसाठी ‘श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशन’च्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘श्री बालाजी महानाट्य’ सादर करण्यात येत आहे.
या महानाट्याचे उद्घाटन श्री त्रिदंडी श्रीमन्नारायण रामानुज चिन्ना जेयर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक नितीन चोरडिया, बिगबॉस फेम अभिनेते अभिजीत बीचुकले, महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲड. सनी रवींद्र कोळपकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री त्रिदंडी श्रीमन्नारायण रामानुज चिन्ना जेयर स्वामी म्हणाले, भारतात भगवान व्यंकटेश यांना दक्षिणेत श्री बालाजी नावाने तर उत्तरेत हनुमानाला बालाजी म्हणून ओळखले जाते. अनेक जण श्री बालाजी यांच्या मामदिरात देखील जावून येतात पण त्यांना बालाजी चा इतिहास माहीत नसतो. ते सांगण्याचे काम हे महानाट्य करत आहे. कलयुगात श्री बालाजी भगवान हे मूर्त रुपात आपल्यात असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. रामलल्ला प्रमाणे त्यांची मूर्ती देखिल मोहक आहे. अशाच एका मंदिर निर्माणासाठी हे महानाट्य सादर होत आहे.
दरम्यान, श्री बालाजी महानाट्य येत्या 11 फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी 5 वां. शांती नगर, कोंढवा येथील चोरडिया कॉर्नर मैदानात सादर होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading