Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

अल्पसंख्यांक युवा संसदेचे १० फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजन

  • पुणे : राज्यात अनेक ठिकाणी युवा परिषद, युवा संसद असे कार्यक्रम होत असताना देशात पहिल्यांदाच सर्वात मोठी अल्पसंख्यांक समाजाची युवा संसद परिषदेचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे .या परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,आसामचे खासदार नबा कुमार ,खासदार वंदना चव्हाण ,तमिळनाडू चे खासदार पी.विल्सन ,महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा ,माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम ,आमदार प्रसाद लाड ,माजी आमदार वारीस पठाण ,अफजल दाऊदनी ,माजी आयपीएस अधिकारी संदीप कर्णिक ,अब्दुर रहेमान ,बी.जी.कोळसे पाटील ,संभाजी ब्रिग्रेडचे प्रवीण गायकवाड ,अँड .असीम सरोदे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.ए.इनामदार असणार आहेत. या कार्यक्रमास देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही संसद १० फेब्रुवारी २०२४ रोजी सांयकाळी ५ वाजता नेहरू मैमोरियल हॉल पुणे स्टेशन येथे होणार आहे. 

    या कार्यक्रमाचे आयोजन जुबेर मेमन, खिसाल जाफरी यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट अल्पसंख्याक समाजातील युवकांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे आहे. या कार्यक्रमात देशातील सर्व अल्पसंख्याक समाजातील युवक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या नेतृत्वाच्या विकासासाठी चर्चा तसेच अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या विकासासाठी विविध योजना आणि त्यावर सविस्तर विचारविणीमय होणार आहे .

    या कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या विकासासाठी एक महत्त्वाची पाऊल उचलले जाणार आहे.तरी या अल्पसंख्यांक युवा संसदेला युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले .

     

     

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading