Wednesday, November 11, 2026
Latest NewsPUNE

महापालिका शाळा क्रमांक १६२ मुलांची मध्ये रस्त्ता सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम


पुणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय व महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक 162 मुलांची चंद्रभागानगर कात्रज येथे रस्ता सुरक्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आरटीओचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील यांनी शाळेचा विद्यार्थ्यांना खेळातून , चर्चेतून सहभागी करून मार्गदर्शन केले. यावेळेला महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे (कात्रज) संचालक शशांक शिळीमकर व महेश शिळीमकर यांनी मार्गदर्शक फलक , रस्ता सापशिडी , वाहतूक चिन्हे वाहतूक नियमावली यातून शाळेत वातावरण निर्मिती केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा महाजन सूत्रसंचालन गायत्री शितोळे व आभार संगिता बागुल यांनी केले. अन्य शिक्षक मनिषा भिलारे , अर्चना डोळस, मीनाक्षी लामदाडे, सुवर्णा भोरडे , चित्रा सोनवणे , आरती शिळीमकर व सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply