Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

शिक्षणासोबत पॅशन जपण्यासाठीच क्रेसेंडो 2024 चे आयोजन

पुणे : आयएसबी अँड एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्यावतीने दर वर्षी फ्लॅगशिप इव्हेंटसह क्रेसेंडो चे आयोजन केले जाते. यामध्ये विविध प्रसिध्द व्यक्तींना आमंत्रित केले जाते, जेणेकरून आयएसबीएमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आपले पॅशन जपता यावे यासाठी यामध्यमातून प्रयत्न केला जातो, असे प्रतिपादन आयएसबी अँड एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आयएसबीएमच्या वतीने आयोजित फ्लॅगशिप इव्हेंटसह तीन दिवसीय क्रेसेंडो 2024 चे आयोजन करण्यात आले. फील इट, रॉक इट, लिव्ह इट. ही शक्तिशाली थीम प्रमुख कार्यक्रमाचे होते. सहभागींना त्यांच्या कामगिरीमध्ये अंतर्निहित भावना, ऊर्जा आणि चैतन्य आत्मसात करण्यास उद्युक्त केले. न्यू लॉ कॉलेज – भारतीय विद्यापीठ, क्राइस्ट कॉलेज लवासा, आणि मॉडर्न कॉलेज गणेशखिंड यांसारख्या महाविद्यालय सहभागी झाले होते. क्रेसेंडो ही केवळ स्पर्धा नाही, हा सर्जनशीलता आणि विविधतेचा उत्सव आहे. या वर्षी स्टेजवर नृत्य-ऑफ, गायन स्पर्धा, बास्केटबॉल स्पर्धा आणि रॅप, इतर आकर्षक कार्यक्रमांसह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भूतकाळातील यशावर आधारीत क्रेसेंडो 2024 च्या 3 व्या दिवशी मेफिल्ड, आयव्ही ग्रीन गार्डन येथे प्रसिध्द गायक कलाकार आदित्य रिखारी कॉन्सर आयोजित केलेे होते. आपल्या मनमोहक परफॉर्मन्ससाठी आणि भावपूर्ण रचनांसाठी ओळखला जाणारा, आदित्य रिखारी या कार्यक्रमात जादूचा स्पर्श करून गेला. सहभागी प्रेक्षकांनी गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला. पत्रकार परिषदेत आदित्य रिखारी म्हणाला की, मी माझे शिक्षण घेता घेता माझे पॅशन जपन आहे. म्हणजेच मी माझे गाने स्वत: लिहितो आणि स्वत: गातो. आपले जे पॅशन आहे तेच आपली कार्यप्रणाली आहे. अधिकतर लोकांना जे पॅशन पसंद आहे त्यात काम करण्यास मिळत नाही. पण मी ते करित आहे त्याचा मला आनंद आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading