Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्स अँड चॅट जीपीटी’ वरील व्याख्यानास प्रतिसाद

पुणे : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्स अँड चॅट जीपीटी’या विषयावर माहिती -तंत्रज्ञान आणि संगणक तज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात झालेल्या या व्याख्यानाला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,कुलसचिव जी.जयकुमार,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण,डॉ.कुलदीप राडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.शिकारपूर म्हणाले,’डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.या नव्या तंत्रामुळे मानवी प्रतिभेला धोका नाही.मात्र,जग एकमेकांशी जोडले गेल्याने खासगीपणा उरलेला नाही.आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मोठ्या प्रमाणावरील माहिती साठ्याचे विश्लेषण लगेच करता येत असले तरी माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करून अगदी व्यक्तिगत पातळीवरील शैक्षणिक,अध्यापनाची व्यवस्था करणे शक्य आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमीत्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी.प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

डॉ.जी.जयकुमार म्हणाले,’आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील अवलंबित्व वाढल्यास मानवी मेंदूच्या विश्लेषणावर,समस्या सोडवणुकीच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.डॉ.सुनीता जाधव यांनी उपक्रमांचा आढावा घेतला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading