घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजेत, तरच घराघरात शिवराय निर्माण होतील – संतोष शिंदे
पुणे : आज घराघरात जिजाऊ निर्माण होण्याची गरज आहे. कारण समाजामध्ये अनिष्ट रूढी, परंपरा, कर्मकांड, अन्याय -अत्याचार इत्यादी प्रकार भयानक पद्धतीने वाढत आहेत. मुलांना चांगलं शिक्षण आणि विचार देण्याची गरज आहे. आपला समाज जाती-जाती धर्मात विभागला जात आहे. समाजाची प्रगती ही तुमच्या कर्तुत्वावर आणि ज्ञानावर असून सुद्धा तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे वळत आहेत. एक स्त्री शिकली तर दोन कुटुंबाच कल्याण करते. म्हणून आज सुशिक्षित असणारे स्त्री जिजाऊंच्या रूपात कौटुंबिक स्वराज्यात रमली पाहिजे. म्हणून घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या तरच समाजाचे कल्याण होईल. घराघरात जिजाऊ निर्माण झाल्या तरच प्रत्येक घरात शिवराय जन्माला येतील आणि त्याची आज समाजाला गरज आहे… असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
सुप्रभात योगसाधना केंद्र यांच्यावतीने 12 जानेवारी निमित्त राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त जिजामाता हॉल, मोहन नगर, धनकवडी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिलांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व प्रवक्ते व योग्य शिक्षक संतोष शिंदे, योगशिक्षक दिपाली पवार, सौ शालिनी शिंदे, सुप्रभात योगाचे समन्वयक भिकाजी साळुंखे, पुणे मनपा समाज विकास विभागाच्या समूह संघटिका रेश्मा झुरुंगे, प्रेरणा कुऱ्हाडे, जयश्री बोबडे, वैशाली सोनवणे, विद्या जाधव, प्रमिला कोळी, प्रमिला चव्हाण, सुनिता चव्हाण, स्वाती निंबाळकर सौ. पुष्पा भारती, रंजना शिंदे, दिपाली शिंदे, जयश्री पवार व खोपडे मॕडम आदी उपस्थित होते.
