कट्टरतावादामुळे आंतराराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता धोक्यात श्रीनिवास सोहोनी
पुणे – कट्टरतावादामुळे आंतराराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता धोक्यात असल्याचे वक्तव्य माजी राजदूत एस. सोहोनी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अलायंस ऑफ यूनिवर्सिटज टू रीइन्फोर्स टीचर ट्रेनिंग करिक्युला टू आउटकास्ट रॅडीकॅलिजम अँड प्रमोट इक्वॅलिटी इन एशियन सोसायटीज (AURORA) च्या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यानिमित्त आंतराराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘कट्टरतावादाशी लढा’ (कम्बॅटींग रॅडीकॅलिजम) या विषयावर आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटनकु लगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी परिषदेचे प्रमुख वक्ते राजदूत एस. सोहोनी यांच्यासह स्पेनमधील मलागा विद्यापीठाचे डॉ. होसे जेजुस डेलगाडो पेना, स्वित्झर्लंडमधील यूरोपियन यूनियनचे डॉ. कार्लोस मॅकॅडो, जेएनयूमधील कॅनेडियन, यूएस आणि लॅटिन अमेरिकन स्टडीज विभागाचे प्रा. (डॉ.) अरविंद कुमार, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाच्या डॉ. शेषाद्री चारी, बनारस हिंदू विद्यापीठाचे ‘प्रा. (डॉ.) टी. पी. सिंग, जर्मनीमधील अरोराच्या सल्लागार एलिजाबेथ स्मिथ आणि प्रभारी कुलसचिव आणि अरोराचे टीम लिडर डॉ. विजय खरे उपस्थित होते.
अती कट्टरतावादामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवर हा धोका कमी करण्यासाठी आंतरविद्यापीठीय सहकार्य आणि शैक्षणिक आदानप्रदान करून कट्टरवादाशी लढा देणे सुरू आहे असेही श्रीनिवास सोहोनी यांनी म्हणाले. तसेच कट्टरतावादावर चर्चा होते अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग सक्रिय असून यांद्वारे नेहमीच राष्ट्रीय-आंतराराष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांविषयी चर्चा घडवून आणली जात असल्याची माहिती यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि स्ट्रॅटेजिक कल्चर अँड सिक्युरिटी फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘कट्टरतावादाशी लढा’ (कम्बॅटींग रॅडीकॅलिजम) या विषयाला धरून ‘समावेशक शिक्षण’ आणि ‘सक्रिय नागरिकत्व’ या विषयावर दिवसभर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या आंबेडकर स्टडीजच्या सभागृहात झालेल्या या परिषदेत चेक रिपब्लिक,आयर्लंड, नेपाळ, रोमानिया, स्पेन, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमधील जवळपास ५० सदस्यांसह राजस्थान, तामिळनाडू आणि ओरिसामधील अरोराचे सदस्य उपस्थित होते.
