Monday, August 31, 2026

Day: December 18, 2023

Latest NewsPUNE

यशाची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असते – शीतल महाजन

पुणे : प्रोफेशनल स्कायडायव्हर म्हणून करिअरची सुरुवात करताना मुलगी म्हणून थांबवले जात होते. स्पॉन्सर मिळत नव्हते, एवढेच नाही तर भारतात

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

नवी दिल्ली : कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार असल्याची  माहिती,

Read More
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ महाराष्ट्राकडून दोन लाख मेट्रिकटन कांदा खरेदी करणार

नवी दिल्ली  : एनसीसीएफ (NCCF) आणि ‘नाफेड’च्या (NAFED) माध्यमातून महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय, केंद्र सरकारने

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

  नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विदर्भासाठी ठोस निर्णय जाहीर केल्याशिवाय विदर्भातून सरकारला जाऊ देणार नाही.- नाना पटोले

नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नागपूर करारानुसार होत असते ते किमान दोन महिने चालले पाहिजे पण केवळ दीड आठवड्याचे

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNE

विषमुक्त जेवणाच्या ताटाबद्दल जागृत व्हा – बीजमाता राहीबाई पोपेरे

पुणे : आजारांपासून लांब राहण्यासाठी रसायनमुक्त  शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक खतांमुळे एकदा माती खराब झाली तर कोणताही डॉक्टर ती चांगली

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

नागपूर : राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर  : राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!!!

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

खाटीक समाजाच्या विकासासाठी महामंडळ स्थापित करा : चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर : राज्यभरातील खाटीक बांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकारने डॉ. संतुजी लाड खाटिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी विधान

Read More
ENTERTAINMENTLatest News

म्हणून टायगर श्रॉफ ” रॅम्बो ” साठी कास्ट झाला

अ‍ॅक्शन फिल्म्स करून कायम चर्चेत राहिलेला अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. टायगर हा त्याच्या पिढीतील पहिला हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन हिरो बनला

Read More
ENTERTAINMENTLatest News

फेब्रुवारीमध्ये भेटायला येणार ‘डिलिव्हरी बॅाय’

‘डिलिव्हरी बॉय’ हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले

Read More
BusinessLatest News

ऍक्सिस म्युच्युअल फंडाने ‘ऍक्सिस यूएस ट्रेझरी डायनॅमिक बाँड ईटीएफ फंड ऑफ फंड’ लाँच केला

मुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंडांपैकी एक ऍक्सिस म्युच्युअल फंड, ‘ऍक्सिस यूएस ट्रेझरी डायनॅमिक बॉण्ड ईटीएफ फंड ऑफ फंड’ या नवीन फंड

Read More
BusinessLatest News

इंडियास्टेटचा दोन प्रभावी अभ्यासक्रमांसह ई-लर्निंगच्या क्षेत्राममध्ये प्रवेश

आज, इंडियास्टेटने ऑनलाइन शिक्षणात प्रवेशाची घोषणा केली. IndiaStat भारत आणि त्याची राज्ये, प्रदेश, जिल्हे आणि संसदीय/विधानसभा मतदारसंघांवरील सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक आणि निवडणूक डेटाची अग्रगण्य आणि विश्वासार्ह पुरवठादार आहे. दोन

Read More
Latest NewsPUNE

एच. ए. स्कूल पिंपरी च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कलादालनाचे उद्घाटन

पिंपरी :  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले होते. येथे काम

Read More
ENTERTAINMENTLatest News

Sony Marathi : नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला!

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता आपल्या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  येते आहे. “निवेदिता माझी ताई” असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते  प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल. सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. “निवेदिता माझी ताई” या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

मॅडी या गोष्टीमुळे ठरतोय मल्टी हायफेनेट 

आर. माधवन हा अभिनेता भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून दिग्दर्शनात

Read More
ENTERTAINMENTLatest News

 ठरलं तर मिसमॅच्ड 3 लवकरच येणार ! 

रोहित सराफने सोशल मीडिया वर काही खास फोटो पोस्ट करून त्याचा चाहत्यांना खुश खबर दिली आहे आणि लवकरच मिसमॅच्ड 3

Read More
ENTERTAINMENTLatest News

एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते.- हार्दिक जोशी

१. ‘जाऊ बाई गावात‘ ह्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदा कॉल आला तेव्हा काय प्रतिक्रिया होती? माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की सूत्रसंचालन आणि मी? पण नेहमी आव्हानात्मक गोष्टी करायची आवड असल्यामुळे मी ह्या संधीचा  विचार केला, थोडा वेळ घेतला, पण झी मराठीचा माझ्यावरती जो विश्वास आहे, जसं आमचं नातं आहे माझ्यासाठी हा निर्णय घेणं त्यांनी सोप्प केलं. मनात थोडीशी धाक धुक ही होती की प्रेक्षक मला ह्या भूमिकेत स्वीकारतील का?  पण आम्ही वर्कशॉप सुरु केलं आणि ते माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरलं. ही संधी सोडायची नव्हती कारण एक कलाकार म्हणून शब्दांचा साठा वाढला पाहिजे असं माझं मत आहे आणि संधीच सोनं करणं आपल्या हातात असतं २. कधी न पाहिलेली अशी संकल्पना आहे ही, तर त्या बद्दल तुझं काय मत आहे ? महाराष्ट्रात ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहिली आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानतो की मला ह्या वेगळ्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बनायची संधी मिळाली. अभिमान आहे मला आपल्या मातीशी जोडलेलं कार्य मी करत आहे. रोज नवीन गोष्टी मला ही शिकायला मिळतात. आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या  गोष्टी लोकांपर्यंत ह्या कार्यक्रमाच्या निमिताने पोहचत आहेत, ह्याऊन उत्तम अजून काय असू शकतं. अप्रतिम संकल्पना आहे ‘जाऊ बाई गावातची’ ३. इतके वेगळ्या विचारांच्या मुलींसोबत कार्य करणे त्यांना गावच्या मातीचे आणि संस्कृतीचे महत्त्व समजवणे तुझ्यासाठी किती आव्हानात्मक आहे? ह्या कार्यक्रमाचे स्पर्धक वेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीमधून आल्या आहेत त्यांनी आपलं आयुष्य खूप ऐशोआरामात जगलं आहे, त्यांचा समाजाकडे पाहण्याचा  दृष्टिकोन वेगळा आहे. पण  जे चूक आहे ते चूक आहे आणि तिथे बोललं गेलंच पाहिजे  पाहिजे आणि मी तेच करत आहे. जिथे आपल्या परंपरेचा- संस्कृतीचा विषय येतो तिथे त्यांना समजवून देणं एक नागरिक आणि ह्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून माझं कर्तव्य आहे असे मानतो. माझ्या पहिल्या मालिकेत ‘तुझ्यात जीव रंगला’ मध्ये राणादा मुलींपासून पासून लांबच होता आणि इथे मी मुलींबरोबर रोज शूटिंग करत आहे ४. ‘जाऊ बाई गावात‘ मध्ये तुझा आवडता स्पर्धक कोण आहे? सगळेच स्पर्धक हुशार आहेत आणि प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे, त्याच्याकडे कोणत्या विषयाबद्दल माहिती कमी असेल तर मला असं वाटतं की ती कमी पूर्ण करायला त्यांची मदत केली पाहिजे. या शोच्या माध्यमातून त्यांना काही शिकता येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे. ५. तू काय अभ्यास केला आहेस ‘जाऊ बाई गावातसाठी‘? झी मराठीने माझ्याकडून ह्या शोची तयारी आधीपासूनच करून घेतली आहे. ५ वर्ष मी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचं शूट कोल्हापुरात करत होतो. त्यामुळे माझी नाळ या मातीशी जोडली गेली आहे. मुळात माझ्या घरात माझ्यावरती लहानपणा पासून चांगले संस्कार झाले आहेत. बालवाडीत असताना माझ्या कडून मारुती स्तोत्र , राम रक्षा पाठ करून घेतला गेला, ज्या वयात नीट वाचता ही येत नव्हतं तेव्हा आज्जीने आमच्यावर हे संस्कार करायची सुरवात केली होती. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तरच आपण येणाऱ्या पिढीला काही शिकवू  शकतो. मला वाटतं हे स्पर्धक जेव्हा इथून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या ज्ञानाची तिजोरी भरलेली असेल. ६. घरातल्यांचा काय प्रतिसाद होता ? माझ्यासाठी हा शो माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे . माझी वाहिनी खूप आजारी होती आणि मी ह्या शो मधून आपले पाऊल मागे घेत होतो. पण जेव्हा माझ्या वाहिनीला समजले की मी ‘जाऊ बाई गावातला’ नकार द्यायला जात होतो, तेव्हा हॉस्पिटल मध्ये तिने तिच्या हातात माझा हात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतले की हा शो तू सोडायचा नाही. कारण तिला माहिती आहे की मी कामातून कधी माघार घेत नाही, तर तिझ म्हणणे होते की जी गोष्ट आज पर्यंत नाही केली ती ह्या पुढे ही करायची नाही. हा शो मी फक्त तिच्यामुळे करतोय आणि योगायोग असा कि ‘जाऊ बाई गावातचा’ पहिला एपिसोड तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण मला नेहमी  खंत राहील की कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघायला ती ह्या दुनियेत नव्हती. मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरवात तिला नमस्कार करून करतो. ७. तुझा अनुभव ‘जाऊ बाई गावात‘ मध्ये टास्क करण्याचा ? तुम्ही नुकताच आर्मी स्पेशल भाग पहिला असेल त्यात एक टास्क होता जो स्पर्धकांनी करायच्या आधी मी केला होता त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी. तो आर्मी टास्क करताना माझा हाथ निखळला, तरी पण मी तो टास्क पूर्ण केला. एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही ना याची सतत मला काळजी घ्यावी लागते.  इतक्या लोकांचा विश्वास, प्रेम आहे माझ्यावर आणि मी कोणालाच निराश होऊ देणार नाही. मी माझी जबाबदारी पूर्णपणे पडणार. ‘जाऊ बाई गावात’ सुरु झाल्यापासून सर्वांकडून फक्त आणि फक्त प्रेम आणि प्रोत्साहन मिळतंय, आणि ही फक्त सुरुवात आहे ह्या कार्यक्रमात प्रेक्षकांना खूप काही पाहायला मिळणार आहे, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.

Read More