मुंबई : मुथूट मायक्रोफिन लिमिटेड (“कंपनी”)ची प्राथमिक समभाग विक्री १० रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी सोमवार १८ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ असेल. ऑफर सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी २७७ रुपये ते २९१ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ५१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५१ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कंपनीचा प्राथमिक समभाग विक्रीतून ९,६०० दशलक्ष रु. (९६० कोटी रु.) पर्यंतच्या एकूण ऑफर साइजसह निधी उभारण्याचा मानस आहे. एकूण ऑफर आकारात ७,६०० दशलक्ष रु. (७६० कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून २,००० दशलक्ष रु. (२०० कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरचा समावेश आहे. कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये थॉमस जॉन मुथूट यांच्या द्वारे १६३.६३ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), थॉमस मुथूट यांच्या द्वारे १६३.८४ दशलक्ष रु. (१६.३८ कोटी रु.), थॉमस जॉर्ज मुथूट यांच्या द्वारे १६३.६१ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), प्रीती जॉन मुथूट यांच्या द्वारे ३३७.३९ दशलक्ष रु. (३३.७४ कोटी रु.), रेमी थॉमस यांच्या द्वारे ३३३.८७ दशलक्ष रु. (३३.३९ कोटी रु.), नीना जॉर्ज यांच्या द्वारे ३३७.६६ दशलक्ष रु. (३३.७७ कोटी रु.) (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) आणि ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल डब्ल्यूआयव्ही लिमिटेड यांच्या द्वारे ५०० दशलक्ष रु. (५० कोटी रु.) (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
Read More