मुथूट मायक्रोफिन लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री १८ डिसेंबर पासून होणार सुरू
मुंबई : मुथूट मायक्रोफिन लिमिटेड (“कंपनी”)ची प्राथमिक समभाग विक्री १० रुपये (“इक्विटी शेअर”) दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्ससाठी सोमवार १८ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. प्रमुख गुंतवणूकदार बोलीची तारीख शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ असेल. ऑफर सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार २० डिसेंबर २०२३ रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी २७७ रुपये ते २९१ रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ५१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ५१ इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीचा प्राथमिक समभाग विक्रीतून ९,६०० दशलक्ष रु. (९६० कोटी रु.) पर्यंतच्या एकूण ऑफर साइजसह निधी उभारण्याचा मानस आहे. एकूण ऑफर आकारात ७,६०० दशलक्ष रु. (७६० कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांकडून २,००० दशलक्ष रु. (२०० कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरचा समावेश आहे.
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा विनियोग कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
विक्रीच्या ऑफरमध्ये थॉमस जॉन मुथूट यांच्या द्वारे १६३.६३ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), थॉमस मुथूट यांच्या द्वारे १६३.८४ दशलक्ष रु. (१६.३८ कोटी रु.), थॉमस जॉर्ज मुथूट यांच्या द्वारे १६३.६१ दशलक्ष रु. (१६.३६ कोटी रु.), प्रीती जॉन मुथूट यांच्या द्वारे ३३७.३९ दशलक्ष रु. (३३.७४ कोटी रु.), रेमी थॉमस यांच्या द्वारे ३३३.८७ दशलक्ष रु. (३३.३९ कोटी रु.), नीना जॉर्ज यांच्या द्वारे ३३७.६६ दशलक्ष रु. (३३.७७ कोटी रु.) (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) आणि ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल डब्ल्यूआयव्ही लिमिटेड यांच्या द्वारे ५०० दशलक्ष रु. (५० कोटी रु.) (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
११ डिसेंबर २०२३ च्या (“RHP”) या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स मुंबई येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र (“RoC”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्सचेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्सचेंज हे बीएसई असेल.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम ३१ सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून सेबी आयसीडीआर नियामकांच्या ३२ (१) निर्देशांनुसार त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात वाटपामध्ये जोडले जातील.
तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग 200,000 रुपयांपेक्षा जास्त आणि 1,000,000 रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीतील दोन तृतीयांश भाग 1,000,000 रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल श्रेणी”) उपलब्ध होईल. ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल.
पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन किंवा ऑफर किमतीच्या वर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ऑफर किमतीवर किंवा त्याहून अधिक ऑफर किमतीच्या बोलीवर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. तपशीलांसाठी, आरएचपीचे पृष्ठ ४७१ पासून सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पहा.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
