Wednesday, November 18, 2026
BusinessLatest News

पॅंटोमॅथ समुहाने भांडवली बाजारातील योगदानाची 10 वर्षे पूर्ण केली, 10 व्या वर्धापन दिनानिमित्त 10 परिवर्तनकारी बदल करणारे उपक्रम लाँच केले 

पुणे : पँटोमॅथ ग्रुप हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या आर्थिक सेवा गटांपैकी एक आहे. गटाने नुकतीच 10 वर्षे पूर्ण केली. त्याप्रसंगी पँटोमॅथ ग्रुपने भांडवली बाजारात आपल्या योगदानाचे दशक पूर्ण केल्याच्या स्मरणार्थ, दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमांची एक मालिका आयोजित केली होती. त्यामध्ये बोर्ड रूम थिंक टँक (बोर्ड रूम विचार गट), गुंतवणूकदारांसाठी इन्व्हेस्टर रोड शो, गुंतवणूकदारांसाठी व्यापारी वस्तूंचे प्रदर्शन असणारे इन्व्हेस्टर एक्स्पो, प्राणिक उपचार सत्र, चित्रपट शो आणि फूड फिएस्टाचा (खाद्य उत्सवाचा) समावेश होता. इतकेच नव्हे तर दिग्गज बॉलीवूड गायक श्री सुखविंदर सिंग यांची प्रत्यक्ष भेट घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणेदेखील कार्यक्रमात समाविष्ट होते.

कार्यक्रमादरम्यान, पँटोमॅथने 10 नवीन उपक्रमांचे प्रदर्शन केले. त्यात डिजिटल गुतंवणूक बँकिंग मंच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) शक्तीवर चालणारे रिअल-टाइम लीड आणि सेल्स जनरेशन इंजिन (विक्री निर्मितीचे इंजिन), कृती करण्यायोग्य निर्णयघेण्यास तयार अशी अंतर्दृष्टी आणि शेकडो स्त्रोतांकडून मिळवलेले अहवाल, वन-स्टॉप ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (एकल भांडवल स्रोत व्यापार मंच), संपत्ती व्यवस्थापन मंच, कल्पना आणि धोरणावर आधारित स्टॉक किंवा विनिमय व्यापार फंडाचा (ETF) पोर्टफोलिओ, आयपीओ-पूर्व (प्रारंभिक सार्वजनिक ऑफर) फंडाची नवीन मालिका, वैज्ञानिक गुंतवणूक मंच आणि अनलिस्टेड सिक्युरिटीज ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (असूचीबद्ध रोखे व्यापार मंच) अशा नवीन उपक्रमांचा समावेश होता. पँटोमॅथ पुढील 10 आठवड्यांत क्रमाक्रमाने हे उपक्रम सुरू करणार आहे.

महावीर लुणावत, सह-संस्थापक, पँटोमॅथ ग्रुप म्हणाले, “पँटोमॅथ ग्रुप भारताच्या विकासात योगदान देण्यात आघाडीवर आहे. 10 वा वर्धापन दिन हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. याचे कारण म्हणजे आम्ही गुंतवणूकदारांना केवळ त्या उच्च-संभाव्य कंपन्या शोधण्यातच मदत केली नाही ज्या ट्रॅक न केलेल्या आहेत तर त्यांना भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यातदेखील मदत करून विकास प्रवर्तक म्हणून काम केले आहे. पँटोमॅथ येथे, आम्ही मूल्य जपत प्रगती करत आहोत आणि सध्या, दशकभरात व्यवस्थापित केलेल्या 109 आयपीओसह आम्ही मजबूत आहोत. भांडवल बाजाराला धोरणात्मक रीतीने आकार देणे आणि मेक इन इंडिया शासनादेशात योगदान देण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांसाठी विकास प्रवर्तक बनणे हे आमचे नेहमीच ध्येय राहिले आहे.

लुनावत पुढे म्हणाले, “मागील वर्षांमध्ये, आमची टीम, व्यवसाय भागीदार, नियामक, गुंतवणूकदार आणि आमच्या इतर भागधारकांमधील ग्राहकांच्या पाठिंब्याने, आम्ही बाजारातील आमच्या योगदानाची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. आज, एक टीम म्हणून, आम्ही निधी उभारणीचे 150 व्यवहार केले आहेत आणि आमचे गुंतवणूकदार नेटवर्क 1000 हून अधिक गुंतवणूकदारांपर्यंत वाढले आहे. आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की, आम्‍ही भारतभरातील 30 हून अधिक विविध उद्योगांमधून 600 हून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. विकासाचा हा सर्व महत्त्वपूर्ण प्रवास आमच्या भागधारकांमुळेच शक्य झाला आहे.”

सुश्री मधु लुनावत, सह-संस्थापक, पँटोमॅथ ग्रुप, म्हणाल्या, “आर्थिक परिसंस्था ही विश्वासावर आधारित असते आणि गेल्या 10 वर्षांत पँटोमथने हेच साध्य केले आहे. पँटोमॅथने आर्थिक परिसंस्थेत विश्वास मिळवला आहे. पँटोमॅथची योग्य मालमत्ता प्रकारांत गुंतवणूक करण्याची स्पष्ट दृष्टी आहे. आज पँटोमॅथ टीमची संख्या 3 वरून झेप घेऊन ती 300 सदस्यांपर्यंत पोहचली आहे. उद्योगातील छुपे बदल घडवणाऱ्या कंपन्यांसाठी एक जोशपूर्ण आणि वैविध्यपूर्ण मंच बनण्याचे आमचे स्वप्न आणि विश्वास आहे. आगामी दशक हे या बदलकर्त्यांचे असेल.”

बोर्डरूम थिंक टँक येथे, श्री हरीश मेहता संस्थापक अध्यक्ष, नॅसकॉम आणि संस्थापक, ऑनवर्ड टॅक्नोलॉजीज लिमिटेड; श्री प्रेम गोधा, सीएमडी, आयपीसीए लॅबोरट्रीज; मिहीर व्होरा, सीआयओ, ट्रस्ट म्युच्युअल फंड; स्वामी श्री परमातानंदजी महाराज आणि दिग्गज गायक सुखविंदर सिंग यांसारखे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी भारताच्या प्रगतीशील आयटी शासनादेशाचा मॅवेरिक्स (अपारंपरिक आणि स्वतंत्र व्यक्ती) प्रभाव; यशस्वी उद्योजकाचा गुप्त स्त्रोत; गुंतवणूकीची कला; उद्योजकतेला भागवत गीतामधील नेतृत्वाच्या धड्याकडे घेऊन जाणे आणि यशाची रूपरेखा तयार करणे यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली.

त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांच्या रोड शोमध्ये, क्रिएटिव्ह न्यूटेक लिमिटेड; मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेड; हाय-टेक पाईप्स लिमिटेड; अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड; प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग लिमिटेड; मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड; एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड; फिनो पेमेंट बँक आणि विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड सारख्या सहभागी कंपन्यांनी त्यांच्या वाढीची धोरणे आणि एकूण मूल्य प्रस्ताव मांडले. यापैकी काही कंपन्या अशा होत्या ज्यांची प्राथमिक बाजारात आतापर्यंतची सर्वाधिक आयपीओ सदस्यता नोंदवली गेली होती.

गेल्या 10 वर्षांपासून, पँटोमॅथ समूह भारतातील सर्वांत दुर्गम स्थानांवरील व्यवसायांपर्यंत पोहोचत आहे. पँटोमॅथ हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या वित्तीय सेवा समूहांपैकी एक बनला आहे. तसेच पँटोमॅथ समूहाने 7000 हून अधिक व्यवसायांचे भारतातील सर्वात मोठे खाजगी नेटवर्क मिळवले आहे.

Leave a Reply