- थरारक अनुभवाचे साम्राज्य पुणेकरांसाठी सज्ज!
पुणे : श्वास रोखून बसलेले पुणे शहर याच अद्भुत दुनियेच्या प्रतीक्षेत होते. मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी द मिल्सची ही रम्यनगरी कात टाकून सज्ज झाली आहे. ऍड्रेनालाइन-इंधनावर चालणारी ही स्वप्नवत् दुनिया पुणेकरांसाठी आता खुली झाली आहे. पुण्याची ही पहिलीवहिली ‘गेम सुपर पार्क’ १.२ लाख चौरस फूट क्षेत्रात विस्तारली आहे. गेमिंगमध्ये एकाहून एक रोमांचकारी अनुभव देणाऱ्या या दुनियेची उभारणी अत्यंत दूरदर्शी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रसूक जैन यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, ‘माइया एन्टरटेन्मेन्ट अँड हॉस्पिटॅलिटी’ या प्रसूक जैन हॉस्पिटॅलिटीच्या उपकंपनीने ही अतुलनीय दुनिया पुणेकरांसमोर पेश केली आहे.
गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्राच्या कक्षा भारतात कशा विस्तारत चालल्या आहेत, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ‘द गेम सुपर पार्क‘ कडे पाहिले जाईल, हे निश्चित! कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक प्रसूक जैन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या प्रकल्पात तब्बल ४० कोटींची प्रारंभिक गुंतवणूक करण्यात आली आहे, यावरूनच या स्वप्ननगरीची सहज कल्पना येईल.’पुणं हे विद्येचे माहेरघर तर आहेच; पण त्याबरोबरच पुण्याचा आर्थिक विकास झपाट्यानं झालाय आणि आर्थिक ताकदीबरोबरच चैतन्यानं रसरसलेली युवाशक्तीही या शहरात सातत्याने नव्याचा, उत्कृष्टतेचा शोध घेत आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी पुणे हेच उत्तम ठिकाण आहे, अशी भावना प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसूक जैन यांनी व्यक्त केली. ही केवळ गुंतवणूक नाही, तर पुणे हे मनोरंजन विश्वाच्या संकल्पना बदलण्यात आघाडीवर असावे, असा हेतू यामागे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
ज्यांना आयुष्यात थ्रिल शोधायचे आहे, त्यांच्यासाठी मन मोहवून टाकणाऱ्या अनेक आकर्षक गोष्टी या जादुई दुनियेत आहेत. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो.
स्नो वर्ल्डः भारतातील प्रमुख स्नो थीम पार्क असलेल्या स्नो वर्ल्डचा समावेश देशातील आघाडीच्या थीम पार्कमध्ये होतो. हिमाच्छादित प्रदेशातील हिवाळ्याचा आस्वाद अभ्यागतांना या ठिकाणी घेता येतो. तुम्ही कोणत्याही वयोगटातील असलात, तरी हा अनुभव घेण्याची मजा अविस्मरणीय असेल.
गेम पॅलॅशिओः मनोरंजनासाठीचे हे आणखी एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. या ठिकाणी बोलिंग ऍली बुटिक, खाण्यापिण्याची उत्तम सोय, गेमिंग आर्केड आणि व्हीआयपी लाउंज अशा उत्तमोत्तम गोष्टी एकत्र केल्या आहेत. खेळ आणि विश्रांती या दोन्हींचा आनंद एकत्रितपणे घेता येऊ शकतो. मनोरंजनाचा बहुविध अनुभव घेऊ पाहणाऱ्या कुटुंबांसाठी किंवा मित्रपरिवारासाठी हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे.
फॉर्म्युला ११ कार्टिंगः गो-कार्टिंगचा खेळ चार पावलं पुढे घेऊन जाणारं आकर्षक ठिकाण म्हणजे फॉर्म्युला ११ कार्टिंग. ‘सोडी’ने मान्यता दिलेला भारतातील हा सर्वांत मोठा चॅम्पियनशिप ट्रॅक आहे. अत्याधुनिक सुविधांसह आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणाऱ्या डिझाइनचा हा ट्रॅक असून, रेसिंगसाठी उत्सुक असलेल्यांना एक उत्कट अनुभव यातून मिळतो. अनुभवी रेसर असणाऱ्यांना त्यांच्या वाहनचालनाच्या कौशल्याची चाचणी घेता येतेच; शिवाय हा अनुभव पहिल्यांदाच घेणाऱ्यांनाही कोर्ट रेसिंगच्या वेगाची आणि थराराची अनुभूती पुरेपूर घेता येते. हा रोमांचक अनुभव सहभागींसाठी अविस्मरणीय ठरतो.
पोक्किडो ट्रॅम्पोलिन पार्कः ट्रॅम्पोलिनसाठीचे भारतातील अग्रगण्य ठिकाण म्हणजे पोक्किडो ट्रॅम्पोलिन पार्क. ट्रॅम्पोलिनचा पारंपरिक अनुभव या ठिकाणी आगळ्यावेगळ्या रीतीने अनुभवता येतो. उसळत्या आनंदाबरोबरच हे पार्क अनेक उत्साहवर्धक बाबींचा अनुभव देणारे पहिले केंद्र ठरले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या परिणामशून्यतेचा अनुभव देण्याबरोबरच परस्परसंवादी खेळांमुळे पोक्किडो ट्रॅम्पोलिन पार्कची रंजकता आणि मजा वाढली आहे. फिटनेसबद्दल आस्था बाळगणाऱ्या, रोमांच शोधणाऱ्या तसेच आनंद शतगुणित करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांना गतिमानतेचा आगळा अनुभव देणारी ही अनोखी पर्वणी आहे.
नाइट लाइफची अनोखी मजा अनुभवू पाहणाऱ्या पुणेकरांच्या हृदयाचा ताबा घेणारे, द मिल्स येथे स्थित असलेले ‘द गेम सुपर पार्क‘ हे भारतातील पहिल्यावहिल्या आर्केड आणि मनोरंजक खेळांचे माहेरघर आहे. या खेळांमध्ये व्ही. आर. स्पिनर, फँटून मोटो बाइक, सोलो कटर, फास्ट अँड फ्युरिअस कार, ऍसॉल्ट कार, डॉगल बॉल अशा एकाहून एक सरस आणि मनोरंजक खेळांचा समावेश आहे.
हॉस्पिटॅलिटी आणि मनोरंजन क्षेत्रातील समकालीन जागतिक संकल्पनांचा समावेश करून, थ्रिल शोधणाऱ्या व्यक्ती आणि समूहांसाठी अनोखे स्थळ तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगून द गेम सुपर पार्कची निर्मिती करण्यात आली आहे, असे जैन यांचे म्हणणे आहे. पुण्याचे पार्क ही केवळ सुरुवात असून, आगामी दोन वर्षांत आपण या क्षेत्रात आणखी विस्तार करण्याची योजना आखत आहोत, असे स्पष्ट करतानाच त्यासाठी अंदाजे ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सर्व वयोगटातील लोकांसाठी, कुटुंबांपासून महाविद्यालयीन युवक-युवतींच्या समूहांसाठी, व्यावसायिक आणि इतर सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी सकाळी ११ ते रात्री ११ या कालावधीत द गेम सुपर पार्कचे दरवाजे खुले आहेत. मौजमजा आणि मनोरंजनाचे पुण्यातील हे सर्वसमावेशक केंद्र ठरणार आहे. पुण्याच्या ‘द गेम सुपर पार्क‘मध्ये साहस, मनोरंजन आणि खेळ कधीच संपणार नाहीत आणि संपावेत असे कुणाला वाटणारही नाही.
माइया एन्टरटेन्मेन्ट अँड हॉस्पिटॅलिटी ही गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रात मुसंडी मारून इतरांपेक्षा वेगाने पुढे जाणारी एक प्रचंड उर्जा आहे. दगदगीतून बाहेर पडून विश्रांती घेण्याची, मनोरंजनाची, खेळांची आणि साहसाची संकल्पना नव्याने परिभाषित करणारी ही शक्ती आहे. प्रसूक जैन यांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांचे मन मोहवून टाकण्याचा, त्यांना नावीन्यपूर्ण आणि रोमांचक अनुभव देण्याचा विडाच जणू कंपनीने उचलला आहे. या जादुई विश्वात टाकलेले पाऊल स्वर्गसुखाची अनुभूती देणारे ठरणार आहे, यात शंकाच नाही.
Related