Tuesday, September 1, 2026
Latest NewsLIFESTYLE

युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, मिसेस, किड्स महाराष्ट्र २०२३ सीझन ४’ चा समारोप

पुणे : युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी आयोजित ‘मिस्टर, मिस, मिसेस, किड्स महाराष्ट्र २०२३ सीझन ४’ चा समारोप रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील आपटे रोड येथील हॉटेल ऑरबीट येथे संपन्न झाला.

या  समारोपाचे यंदाचे चौथे वर्ष होते. पुण्यात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यात चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर, पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड, सोनाली कणखरे (ज्युरी) लीना पवार पाटील (ज्युरी) डॉ. ज्योती बोरसे (ज्युरी) अशोक गवित्रे ( ज्युरी ) श्रुती ओव्हाळ (ज्युनियर महाराष्ट्र) अविनाश खोचरे (चित्रपट दिग्दर्शक), जुबेर शेख (मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया), महिमा लोखंडे (मॉडेल आणि फॅशन डिझायनर), मेजर टेक्सटाईल (फॅशन डिझायनर), स्नेहल पाठक (मॉडेल आणि अक्ट्रेस ) रविन्द्र जाधव, राज नायर, तनिशा जैन (अँकर), ग्रुमर आणि कोरियोग्राफर नरेश फुलेल्लू, ईशा राजे, क्षितिज गायकवाड विघ्नेशा गवारी, शो स्टॉपर काजल कोरडे शो स्टॉपरमेकअप आर्टिस्ट उज्ज्वला आऊते व अन्तिमा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे विजेते तनिष्का वाडकर डायमंड विजेता, गौरी पायगुडे बेस्ट रॅम्प वॉक, श्रुती तूपसौंदर बेस्ट ग्लॅमरस लुक, अमृता बनसोडे मिस सिल्वर विजेता, प्रभावाती वरदराज बेस्ट एक्सप्रेशन, अपर्णा आधे गोल्ड विनर, धनश्री ढमाले बेस्ट फोटोजेनिक फेस, सुहाणी शिगवण बेस्ट एटीट्यूड, श्रीमयी पाटील बेस्ट कॉन्फिडेंस, अद्विक सनी जगताप बेस्ट फोटोजेनिक, शिवतेज शिंदे गोल्ड विनर, सेजल मच्छिंद्र वारगड बेस्ट एक्सप्रेशन अॅवार्ड, श्रावणी कदम बेस्ट अटायर, मधुरा वारंगे बेस्ट ऑथेंटिक पर्सनॅलिटी, वैभव तिवारी शाइनिंग स्टार, वेदीका गायकवाड बेस्ट एट्टीट्यूड अॅवार्ड, कल्याणी सुनील घोडके डायमंड विनर, ईथन कोरडे सिल्व्हर विनर, अण्वी शहाणे बेस्ट टॅलेंट, अकिरा पाठक बेस्ट स्माईल, हर्षवीर खोचरे बेस्ट टॅलेंट, सम्राट पाठक बेस्ट रॅम्प वॉक, श्रावणी जगताप ग्लॅमरस लूक, कोमल भामरे-पगारे मीसेस महाराष्ट्र गोल्ड विनर, वैशाली कांबळे मिसेस महाराष्ट्र, बेस्ट रॅम्प वॉक विनर मेघना आठल्ये, डायमंड विनर माधवी राय, सिल्व्हर विनर सिद्धार्थ आठल्ये, मिस्टर महाराष्ट्र डायमंड विनर हार्दिक घाग, मिस्टर महाराष्ट्र गोल्ड विनर सुमित पाटोळे, मिस्टर महाराष्ट्र २०२३ सिल्व्हर विनर अर्जुन झुंबरे, बेस्ट रॅम्प वॉक अफरोज सैय्यद, मिस्टर महाराष्ट्र बेस्ट फोटोजेनिक, विजय किरवले मिस्टर‌ महाराष्ट्र बेस्ट स्माइल, सिद्धांत गायकवाड मिस्टर महाराष्ट्र बेस्ट एटिट्यूड हे ही उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘आदर्श पत्रकार’ तथा ‘आदर्श संपादक’ अशा दोन उच्च पुरस्काराने विविध पत्रकारांचा आणि संपादकांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. विश्वासराव आरोटे (संपादक दैनिक समर्थ गांवकरी), श्री. नवनाथ जाधव (कार्यकारी संपादक दैनिक समर्थ गांवकरी), श्री. गौरव सुर्यकांत मैड, (समुह संपादक दैनिक समर्थ गांवकरी), सौ. सुचिता भोसले-हरपळे (संपादिका न्यूज प्रहार), श्री. हसन इमाम शेख, (संपादक दै. दायित्व), सौ. सुरेखा सावंत-मते (प्रतिनिधी दै. संध्या), श्री. तुषार काळभोर (प्रतिनिधी दै. आरंभ पर्व), श्री. अमोल भोसले (प्रतिनिधी दै. केसरी), सौ. माधवी जोशी (संपादिका अभिमान टाईम्स), श्री. प्रसाद कुलकर्णी (कार्यकारी संपादक अभिमान टाईम्स), श्री. अभिषेक बांदर्गे (प्रतिनिधी दै. विश्वदर्पण) श्री. संजय गायकवाड (संपादक पुणे मेट्रो) श्री. अभिषेक मरगळे (संपादक माझा देश) श्री. प्रतिक गंगणे (संपादक पुणे प्रहार), तुकाराम गोडसे (संपादक रॉयल मिडिया न्यूज) आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड म्हणाले, मुलींपासून ते महिलांपर्यंत आणि मुलांपासून ते पुरूषांपर्यंत सर्व गटातील लोकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटी सातत्याने कार्य करत असते. या कार्यक्रमाचे हे ४थे वर्ष होते. कार्यक्रमात रोजच्या धकाधकीच्या वेळेत स्वत:ला विसरून काम करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले.

दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीने सातत्याने समाजातील कर्तुत्ववान व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. ‘समाजकार्य’ या विषयातही उद्धव खरड यांनी यावे त्यांना आम्ही नेहमी सहकार्य करत राहू. समर्थ गांवकरीला सन्मान दिला ही आमच्यासाठी आनंदाची बाब होती.

न्यूज प्रहारच्या संपादिका सौ. सुचिता भोसले-हरपळे म्हणाल्या, संस्थेने लहान मुलांसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे लहान मुलांमधल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. युएस स्क्वेअर मिडीया ॲण्ड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्रतिक गंगणे म्हणाले, उद्धव खरड यांचे काम खरच खूप चांगले आहे. आणि या कार्यक्रमात ‘पत्रकारांचा केलेला गौरव’ आम्हा सर्व पत्रकारांना सुखावणार होता. पुण्यात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे आम्ही पत्रकार स्वागत करू तसेच कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याची जबाबदारीही घेऊ.

‘मिस्टर, मिस, मिसेस, किड्स महाराष्ट्र २०२३ सीझन ४’च्या फलकांवर यंदा वृत्तपत्रांची छाप

आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमस्थळी अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले होते त्या प्रत्येक फ्लेक्सवर, दै. समर्थ गांवकरी, न्यूज प्रहार, दै. दायित्व, दै. संध्या, दै. आरंभ पर्व, दै. केसरी, अभिमान टाईम्स, दै. विश्वदर्पण, पुणे मेट्रो, माझा देश, रॉयल मिडिया न्यूज, पुणे प्रहार या वृत्तपत्रांची छाप दिसून आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading