जागतिक हृदय दिन : पन्नाशी पेक्षा कमी वयोगटात हृदयासंबंधीच्या आजारात वाढ; जीवनशैलीत बदल करण्यावर डॉक्टरांचा भर
पुणे – विशेषत: पुण्यातील तरुण वर्गामध्ये ह्रदयविकाराचा झटका आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्या घटनांचे वाढते प्रमाण (CVD) – हे चिंतेचे कारण बनले आहे. या वर्षी शहराच्या लोकसंख्येवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की २५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये ४१ टक्क्यांहून अधिक जणांच्या रक्तप्रवाहात होमोसिस्टीनची उच्च पातळी दिसून आली. होमोसिस्टीनचे वाढते प्रमाण हृदयविकाराच्या दृष्टीने धोकादायक चिन्हांपैकी एक मनाले जाते.
हे खूप चिंताजनक असल्याचे लक्षात आल्यानंतर, जागतिक हृदय दिनानिमित्त, पुण्यातील डॉक्टरांनी तरुण लोकांमधील या धोक्या कडे वेळेवर लक्ष देण्याची, वैद्यकीय तपासणी आणि उपाय करण्याची गरज याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
CAD हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे.
भारतातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे प्रमाण हे इतर जगाच्या तुलनेत नेहमीच जास्त राहिले आहे. मात्र आता, असे आढळून येत आहे की, रुग्णाचे वय जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी होऊ लागले आहे. इंडियन हार्ट असोसिएशननुसार, इतर लोकसंख्याशास्त्राच्या तुलनेत जवळजवळ ते ३३ टक्के पर्यंत कमी झाले आहे.
जीवनमानाचे प्रमाणही फारसे चांगले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ४०-६९ वयोगटातील मृत्यूंपैकी ४५% मृत्यू CVDs मुळे झाले होते. यासंबंधीचे पुरावे आणि प्रसारमाध्यमांचे अहवाल हे सूचित करतात की तेव्हापासून हे प्रमाण वाढतच आहे. जर आपण निव्वळ मृत्यूच्या कारणाच्या माहितीचे विश्लेषण केले तर लक्षात येते की एकट्या महाराष्ट्रात, सीव्हीडीमुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण एका वर्षात प्रति हजार लोकसंख्येमागे अंदाजे १.५४ मृत्यू इतके आहे.
तरुण वर्गावर परिणाम करणारे धोकादायक घटक
जुपिटर हॉस्पिटल, बानेर, पुणे, या रुग्णालयातील, इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट, डॉ.राजेंद्र पाटिल, म्हणाले, “पुण्यातील माझ्या वैद्यकीय अनुभवावर आधारित, व्यक्तींना हृदयविकाराचा धोका निर्माण करणारे प्राथमिक जोखीम घटक म्हणजे जीवनशैलीविषयक विकार. त्यात उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांचा समावेश होतो. धूम्रपानासारख्या अस्वास्थ्यकर सवयी, अति प्रमाणात मद्यपान, बैठी जीवनशैली आणि जंक फूडने भरलेला आहार यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते. याशिवाय, व्यस्त जीवनशैली, जन्मजात विकार किंवा हृदयविकाराचा अनुवंशिक इतिहास यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.”
कशाकडे लक्ष द्यायचे ते जाणून घ्या
छातीत दुखणे या गोष्टीकडे अनेकदा आम्लपित्त किंवा अपचन म्हणून दुर्लक्ष केले जाते. परंतु हे हृदयविकाराच्या सर्वाधिक सर्वसाधारण इशारा देणाऱ्या लक्षणांपैकी एक आहे. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. छातीत जडपणा येणे, जडपणा जाणवणे, धडधडणे, वरच्या बाजूला कळ येणे, घाम येणे, धाप लागणे, ढेकर येणे, डोके हलके होणे, छातीत जळजळ होणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे यासारखी लक्षणे गांभीर्याने घेतली पाहिजेत. लवकर निदान करणे महत्वाचे आहे. कारण लवकर निदान झाल्यास यशस्वी उपचार करता येऊ शकतात.
हृदय रक्तवाहिन्यांचा विकार
“हृदयविकारांच्या संख्येपैकी, तरुणांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येणारा एक विकार म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD). CAD हा भारतातील एक महत्त्वपूर्ण आरोग्य चिंतेचा विषय आहे. याचे कारण लोकसंख्येच्या मोठ्या भागावर याचा परिणाम होत आहे. जीवनशैलीत सुधारणा, नियमित व्यायाम आणि CAD जोखीम कमी करण्यासाठी नियमित हृदय आरोग्य तपासणी आवश्यक आहे,” असे डॉ.. म्हणाले.
“सीएडीसाठी पसंतीचा उपचार पर्याय म्हणजे कोरोनरी अँजिओप्लास्टीद्वारे स्टेंट प्लेसमेंट. बंद झालेल्या हृदयाच्या धमन्या उघडणारी ही कमीत कमी प्रतिकारात्मक प्रक्रिया आहे. बायोरिसॉर्बेबल स्टेंटच्या उपलब्धतेमुळे आज उपचारांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
लवकर निदान, वेळेवर उपचार जीव वाचवू शकतो
.. रुग्णालयातील डॉ… म्हणाले, “जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमध्ये जाणीवपूर्वक बदल केल्यानेच केवळ सीव्हीडीच नव्हे तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा धोका कमी होण्यासही मदत होते. हा अतिशय साधा सरळ सल्ला आहे महणून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये.”
“तरुणांनी उच्च रक्तदाब, लिपिड प्रोफाइल, शुगर टेस्टिंग इत्यादीसाठी लवकर नियमित तपासणी करणे अत्यंत योग्य आणि महत्वाचे आहे. ज्यांच्या कुटुंबात हे अनुवंशिक आजार आहेत किंवा ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांनी या चाचण्यांमध्ये ईसीजी, स्ट्रेस इको यांचीही भर घालावी,” असेही ते म्हणाले.
