Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

फिल्म माझे करिअर आहे , नृत्य माझी साधना आहे आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे –  हेमा मालिनी

पुणे : फिल्म माझे करिअर आहे , नृत्य माझी साधना आहे आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे.  असे भावपूर्ण उद्गार अभिनेत्रीनृत्यांगना  पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खाहेमा मालिनी यांनी काढले३५ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवाचे बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेत्यावेळी त्या बोलत होत्यापुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयलमुख्य समन्वयक अॅडअभय छाजेडपदाधिकारी  कश्यपसिंह चुडासमाबाळासाहेब अमराळे अतुल गोंजारीमोहन टिल्लूश्रीकांत कांबळे  चित्रकार महिला या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेमा मालिनी म्हणाल्या कीराधे राधे आज राधाष्ट्मी आहे आणि आज महिला महोत्सवाचे उद्घाटन देखील आहे ही खूप मोठी गोष्ट आहेमी मथुरावरून येत आहेआजचा दिवस खूप शुभ आहेयाठिकाणी येऊन मला खूप आनंद होत आहेआय लव्ह पुणेआय लव्ह पुणेकर अस सांगून त्या म्हणाल्या कीगेली २० वर्षे मी राजकारणात आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक आणल त्यामुळे महिलांना ३३आरक्षण राजकीय आरक्षण मिळणार आहेहे फार महत्वाचे आहे.

त्या पुढे म्हणाल्या की , या पेंटिंग स्पर्धा  प्रदर्शनात अनेक आर्टिस्टने येऊन माझी पेंटिंग बनवलीपणआज ड्रीम गर्ल वर पूर्ण सब्जेक्ट बनविण्यात आलायाबद्दल आभार व्यक्त करून त्या म्हणाल्या कीआपण माझ्याबद्दल या प्रदर्शनातून व्यक्त केलेल्या भावनांमुळे मी भारावून गेले आहे.  यापुढे त्या म्हणाल्या कीपुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी तब्बल ३५ वर्ष देशातील हा संस्कृती महोत्सव चालू ठवला याबद्दल यांचे अभिनंदन केले पाहिजेसंपूर्ण देशातील कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतातया मंचावर आपली कला सादर करणारे उगवते  नवोदित कलाकार या देशात चमकत आहेत ही कौतुकाची बाबा आहे.  पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सव सुरु केलात्यामुळेपुण्यातील हजारो महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहेही आनंदाची बाब आहेया महिला महोत्सवात विविध स्पर्धांच्या संयोजकांचे देखील त्यांनी कौतुक केले.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवतील ब्रायडल मेक अप स्पर्धेच्या संयोजिका दिपाली पांढरे यांनी स्वागत केलेपाककला स्पर्धेच्या संयोजिका करुणा पाटील यांनी प्रस्तावना केलीमिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी आभार मानलेनीरजा धिरेन्द्र यांनी सूत्रसंचालन केलेतसेचमिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजक अमृता जगधने आणि महिला नृत्य स्पर्धेच्या संयोजक संयोगिता कुदळे यांनी हेमाजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेमहिला महोत्सवातील पेंटिंग स्पर्धा  प्रदर्शनाच्या संयोजक अॅडअनुराधा भारती यांनी हेमा मालिनी यांना हँडपेंटेड साडी  पंजाबी दुपट्टा भेट दिलायाप्रसंगीवर्षा कुलकर्णीसहयोगी संपादक सकाळतनिष्का व्यासपीठमाधुरी घुले आणि अनुराधा हटकर समन्वयक कस्तुरी क्लब पुढारीमेघना पालकर समन्वयक संस्कृती क्लब पुण्यनगरी आणि डॉअंजली जोशी मिडास टच इन्स्टिट्यूट यांचा हेमा मालिनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाएक सशक्त व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून उत्कृष्ट महिला संघटन आणि सक्षमीकरण केले या कार्याचा गौरव म्हणून पुणे फेस्टिवल महिला महोत्सवातर्फे या समन्वयकांचा सन्मान हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आला.

बालगंधर्व कलादालनातील या पेंटिंग्ज प्रदर्शनात ‘ड्रीम गर्ल’ हेमाजींवर आधारित विविध लक्षवेधी पेंटिंग्ज लावण्यात आली होतीहे प्रदर्शन बघताना हेमा मालिनी यांनी प्रत्येक पेंटिंगपाशी त्या पेंटिंगच्या चित्रकार युवतीस उभे करून स्वतमोबाईलमधून सेल्फी फोटो आठवणीसाठी काढून घेतलेही पेंटिंग्ज बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होतीदेशातील आकृती ग्रुपच्या दीडशे महिलांनी ही पेंटिंग्ज चितारली होतीहे प्रदर्शन सोमवार दि२५ सप्टेंबरपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे रोज सकाळी १०.०० ते रात्री .०० यावेळेत प्रेक्षकांसाठी विनामुल्य खुले आहे.

हे ‘कॅनव्हास ऑफ  ड्रीम गर्ल पोट्रेट  कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा  प्रदर्शन असून याचे यंदाचे चौदावे वर्ष आहेयामध्ये पेन्सिल स्केचचारकोलऍक्रेलिक कलरऑइल पेंटवॉटर कलर अशा सर्व माध्यमातून १८ २२ पासून२२ ३० इंच साइजच्या कॅनव्हासपर्यंत चित्र प्रदर्शित केली आहेतत्याचप्रमाणे हेमा मालिनी यांचे ऑइल पेंट  वॉटर कलर अशा दोन्ही माध्यमातून लाईव्ह पोट्रेट काढण्यात आली.

 

यंदाच्या वर्षी या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे, ‘आकृती‘ ग्रुपच्या  पंजाबहरियाणाकेरळउत्तरप्रदेशउत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या ५० महिला चित्रकारांनी  फुट रुंद  १८ फुट लांबकॅनव्हासवर पुणे फेस्टिवलच्या प्रसिद्ध ‘गणेशाची प्रतिमा‘ असलेला लोगोहाताने पेंट केला   दोन्ही बाजूला  अशा अष्टविनायकाच्या प्रतिमा रंगवल्या.

पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव अंतर्गत आयोजित या पेंटिंग स्पर्धेत  डॉ.राजेत्री कुलकर्णी प्राध्यापिका एस.एन.डी.टीकॉलेज  श्रीमती हेमा जैन माजी प्राध्यापक जे.जेस्कूल ऑफ आर्ट्स यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलेराहुल बळवंतप्रिन्सिपल अभिनव कला विद्यालयपुणे यांच्या हस्ते बक्षिसे दिली गेलीयाचे निकाल पुढीलप्रमाणेपोर्ट्रेटमध्ये  प्रथम पारितोषिक उर्मिला दुरगुडे (ठाणे),द्वितीय पारितोषिक अनुराधा कुलकर्णी (पुणे). पोस्टरमध्ये प्रथम पारितोषिक स्वाती केणे (नागपूरआणि द्वितीय पारितोषिक जसविंदर सिंग(लुधियाना).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading