गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ओकिनावा ऑटोटेक आणि पाइन लॅब्जचा सहयोग भारतात इलेक्ट्रिक दळणवळण आणि फिनटेकची क्रांती
नवी दिल्ली : भारतातील एक आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओकिनावा ऑटोटेकने गणेश चतुर्थीच्या आनंददायी प्रसंगी, एक प्रमुख व्यापारी वाणिज्य ओम्नी चॅनल प्लॅटफॉर्म, पाइन लॅब्ज सोबत आपली भक्कम भागीदारी आनंदाने जाहीर केली आहे. या सहयोगाचा उद्देश ग्राहकांना रोमांचक संधी आणि विनाअडथळा अखंड अनुभव प्रदान करत भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि फिनटेकमध्ये क्रांती घडवून आणणे हा आहे.
ओकिनावा ऑटोटेक आणि पाइन लॅब महाराष्ट्रात स्वतःच्या मालकीचे इलेक्ट्रिक वाहन (EV) घेण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एकत्र आले आहेत. ही भागीदारी डाउन पेमेंट्स, छुपे शुल्क, हायपोथेकेशन आणि भौतिक दस्तऐवजांची गरज काढून टाकते. ग्राहक आता २४ महिन्यांपर्यंतच्या लवचिक कालावधीसह झटपट कर्जाचा आनंद घेऊ शकतात आणि स्वतःच्या मालकीची ईव्ही घेण्याचा त्रासमुक्त मार्ग सुनिश्चित करतात.
गणेश चतुर्थी दरम्यान ईव्ही प्रेमी लोकांसाठी सणासुदीच्या खरेदीचा अनुभव वाढवण्यासाठी, ओकिनावा ऑटोटेक आणि पाइन लॅब्जने ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ योजना सादर केली आहे. अधिक आर्थिक लवचिकता आणि सुविधा सुनिश्चित करत हे एकत्रीकरण ग्राहकांना विक्रीच्या वेळीच सुलभ ईएमआय पर्याय मिळवून देण्याची अनुमती देते.
रिटेल फायनान्स शोधू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील दुचाकी प्रेमी लोकांसाठी पाइन लॅबद्वारे नवीन ईएमआय पर्याय पेपरवर्क आणि ऑनबोर्डिंग वेळ कमी करून प्रक्रिया जलद करतील. निवडक बँकांचे क्रेडिट कार्ड धारक १५०० रुपयांपासून ५०००* रुपयांपर्यंत विशेष ५% कॅशबॅक देखील घेऊ शकतात. ३ ते २४ महिन्यांपर्यंत लवचिक ईएमआय कालावधी उपलब्ध आहेत.
कंपनीच्या प्रवक्त्यानुसार:
“पाइन लॅब्जसोबतच्या आमच्या धोरणात्मक सहयोगाद्वारे, ओकिनावा ऑटोटेक आमच्या महाराष्ट्रातील ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर एक अखंड आणि आनंददायी खरेदी अनुभव देण्यासाठी एक उल्लेखनीय प्रवास सुरू करत आहे. रिटेल वित्तपुरवठा या संबंधित सर्वसाधारणपणे येणारे अडथळे दूर करतइलेक्ट्रिक दळणवळण सर्वांना सहजी उपलब्ध करून देण्यासाठी आणि किफायतशीर बनवण्यासाठी असलेली आमची बांधिलकी या सहयोगातून अधोरेखित होते. आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम शाश्वत वाहतुकीच्या नवीन युगाची सुरुवात करेल आणि गणेश चतुर्थीच्या उत्सवात खरेदीवर आकर्षक ऑफर आणि सवलतींसह अतिरिक्त आनंद देईल.”
आणखी एका अग्रगण्य वाटचालीत, ओकिनावा ऑटोटेक हे पाइन लॅब्जच्या सहकार्याने, निवडक क्रेडिट/डेबिट कार्ड्सवर, ३ महिन्याच्या कालावधीसाठी १००% नो कॉस्ट ईएमआय* सादर करत myEMI: Pine Labs Exclusive सादर करत आहे.
ओकिनावा ऑटोटेक आणि पाइन लॅब्ज महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा आनंद वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून, किरकोळ ग्राहक फायनान्सला आकार देण्यासाठी, ते सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे बनवण्यासाठी वचनबद्ध आहेत. ग्राहक विशेषकरून पाइन लॅब्ज मशीनने सुसज्ज असलेल्या ओकिनावा डीलरशिपमध्ये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सवलतींसह विविध योजनांचा आनंद घेऊ शकतात. अधिक तपशीलांसाठी, कृपया तुमच्या जवळच्या ओकिनावा डीलरशिपला भेट द्या. (*T&C लागू).
