Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

एंटेरो हेल्थकेयर सोल्युशन्स लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी फाईल केले

आर्थिक वर्ष २०२२ मधील महसुलानुसार, भारतातील हेल्थकेयर उत्पादनांच्या सर्वात आघाडीच्या तीन वितरकांपैकी एक एंटेरो हेल्थकेयर सोल्युशन्स लिमिटेडने बाजारपेठ नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केले आहे.

कंपनीच्या आयपीओमध्ये १०,००० मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांनी प्रस्तुत केलेल्या ८५,५७,५९७ पर्यंतच्या इक्विटी समभागांचा समावेश असणार आहे.

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये प्रभात अग्रवाल यांच्याकडून ५,३४,०८२ पर्यंत; ऑर्बिमेड एशिया III मॉरिशस लिमिटेडकडून ७५,००,००० पर्यंत; प्रेम सेठी यांच्याकडून ३,५३,३०२ पर्यंत; चेतन एम. पी. यांच्याकडून ४,४०१ पर्यंत; दीपेश टी गाला यांच्याकडून १,३२० पर्यंत; हेमंत जोस बॅरॉस यांच्याकडून ८,८०२ पर्यंत; हेमंत जग्गी यांच्याकडून ४,४०१ पर्यंत; के आर व्ही एस वाराप्रसाद यांच्याकडून २,२०१ पर्यंत; के ई प्रकाश यांच्याकडून ३९,६१० पर्यंत; लवू सहदेव यांच्याकडून १,३२० पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे.

या ऑफरमधून जे भांडवल उभारले जाईल त्याचा उपयोग कंपनी व तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही कर्जांची परतफेड/मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी आणि अधिग्रहणामार्फत इनऑरगॅनिक ग्रोथ उपक्रम चालवण्यासाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

एंटेरो हेल्थकेयर सोल्युशन्स लिमिटेडची स्थापना २०१८ साली प्रमोटर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. प्रभात अग्रवाल तसेच प्रमोटर, पूर्णकालीन डायरेक्टर व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांनी भारतभर, संघटित, तंत्रज्ञानाच्या आधारे चालवण्यात येणारा आणि एकात्मिक हेल्थकेयर प्रॉडक्ट्स डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म निर्माण करण्याच्या उद्देशाने केली. ही कंपनी हेल्थकेयर प्रॉडक्ट उत्पादकांना फार्मसी, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स यांच्यापर्यंत पोहोच उपलब्ध करवून देऊन मदत करते. ३१ मार्च २०२३ रोजीच्या आकडेवारीनुसार, या कंपनीची देशभरात ७३ वेयरहाउसेस आहेत, लास्ट-माईल डिलिव्हरी इन्फ्रास्ट्रक्चर, फार्मसी, हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्ससोबत संबंध यामुळे हेल्थकेयर उत्पादने बनवणाऱ्यांना त्यांची उत्पादने खूप जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतात. आर्थिक वर्ष २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये या कंपनीने अनुक्रमे ३९५००, ६४२०० आणि ८१४०० पेक्षा जास्त रिटेल ग्राहकांना, १६००, २५०० आणि ३४०० पेक्षा हॉस्पिटल ग्राहकांना सेवा पुरवल्या. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचे १९०० पेक्षा जास्त हेल्थकेयर उत्पादकांसोबत पुरवठा संबंध आहेत ज्यामुळे त्यांना ६४५०० प्रॉडक्ट एसकेयूला ऍक्सेस मिळतो.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.

 

डीआरएचपी लिंक:

https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Entero%20Healthcare%20Solutions%20Limited%20DRHP.pdf

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading