fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

राजवीर – मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला 

सोनी मराठी वाहिनी वरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणेशोत्सवात राजवीर सराफ याच्या घरचे टिटवाळा येथील पुरातन कालीन सिद्धिविनायक महागणपती मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी जातात. शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाचा एकमेव साक्षीदार असलेल्या या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. यंदा राजवीर देखील आपल्या कुटुंबा सोबत महागणपतीच्या दर्शनाला जाणार आहे; आणि राजवीर सोबत भाऊसाहेब म्हणजे बॉडीगार्ड देखील जातो. मात्र, मनोमन राजवीरला मयूरी आपल्या सोबत असती तर कीती छान झाल असतं ? असा विचार करतो. तेव्हा असं काहीतरी तरी घडतं की भाऊसाहेब वेश बदलून मयूरीच्या वेशात येतो, अन् राजवीर आणि मयूरी दोघेजण एकत्र या गणपतीच्या दर्शनाला जातात. राजवीर – मयूरी एकत्र गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर नक्की काय होतं? मालिकेत पुढे काय होणार? आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने  मयूरी आणि राजवीर एकत्र येतील का?  हे जाणून घेण्यासाठी  पहा ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’. सोम. ते शनि., संध्या. ७.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: