fbpx
Saturday, September 30, 2023
ENTERTAINMENTLatest News

झी मराठीवरील मालिकांच्या सेट वर होणार बाप्पाचे आगमन ! पहा Photos

 

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस / तास उरले आहेत.गणेश चतुर्थी निम्मिताने जवळ जवळ सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार हे तुम्हाला ह्या आठवड्यात दिसून येईल.

अर्जुनची कोर्ट सुनावणी असल्याने त्याला ‘आजच शिक्षा होणार का?’ असा प्रश्न पडतो. त्याला घर व घरातल्या लोकांना सोडून जावं लागेल, ह्याची जाणीव होते. कोर्टात जाताना आप्पी त्याला विश्वास देते कि, काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत आहे. अर्जुन प्रेमाने अप्पीला हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी डब्बा पाठवतो आणि सोबत चिट्ठी पाठवतो. त्या चिट्ठीत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करतो. आता बाप्पाचा आशिर्वादाने अर्जुन वरच हे संकट होईल?

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरात सुद्धा गणेश आगमनाची तयारी चालू आहे. रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. तर खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान ह्यावेळी ओवीला मिळणार आहे.

‘तू चाल पुढं’ मध्ये अश्विनीची वार्षिक परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण चालू आहे. तिची सगळी धावपळ होत आहे. दर वर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डर सुधा घेतली आहे.ह्या सर्व जवाबदाऱ्या अश्विनी विघ्न्हर्त्याच्या साक्षीने पार पाडताना आपण पाहाल.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे. आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. ह्यातच तिच्या हाताला जखम होते आणि पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येतं.

‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे.

पाहायला विसरू नका अप्पी आमची कलेक्टर ६:३० वाजता, सारं काही तिच्यासाठी ७ वाजता, तू चाल पुढं ७:३० वाजता , तुला शिकवीन चांगलाच धडा ८ वाजता, नवा गडी नवं राज्य ९ वाजता आणि ३६ गुणी जोडी ११:३० वाजता फक्त आपल्या झी मराठी वर.

Leave a Reply

%d bloggers like this: