fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्य मंत्रिमंडळाने आज मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प केला.! – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प केला.! असे मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०१६ नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. २०१६ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. परळी वैजनाथ येथे आयुर्वेद पार्क, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्याचे भगीरथ प्रयत्न, वेरूळच्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा १५६.६३ कोटींचा, श्री तुळजा भवानी मंदिराचा १,३२८ कोटींचा, तर ६१ कोटींचा श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह पर्यटन विकासासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत.

आजच्या लोकाभिमुख निर्णयाने मराठवाड्याचा अनुशेष दूर होईल व महायुतीचे आपले सरकार जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करेल, ही खात्री मला आहे. असेही बावनकुळे म्हणाले. 

Leave a Reply

%d bloggers like this: