“फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम”चे अनावरण
पुणे : फिनिक्स मिल्स लि. (PML),या देशातील अग्रगण्य डेस्टिनेशन रिटेल मॉल डेव्हलपर आणि ऑपरेटरने येथील आपला दुसरा मॉल “फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम” सुरू केला आहे. हा भव्य मॉल १६ एकर जागेवर उभारण्यात आला असून, १२ लाख चौरस फूटापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील दुकाने, कार्यालये भाडेतत्वावर देण्यात आली आहेत.
फिनिक्स मिल्स लि.ने कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डच्या (CPP Investments) सहकार्याने संयुक्त उपक्रमांतर्गत हा मॉल विकसित केला आहे. देशातील आघाडीचा मॉल विकसक असणाऱ्या या कंपनीने देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये १२ ठिकाणी फिनिक्स मॉल्स उभारले असून, सुमारे १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावरील जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
द फिनिक्स मिल्स लि.चे अध्यक्ष अतुल रुईया म्हणाले, “२००६ मध्ये, आम्ही पुण्यातील विमाननगर या पूर्वेकडील भागात जागा मिळवून या क्षेत्रातील आमच्या वाटचालीला सुरुवात केली. २०११ मध्ये फिनिक्स मार्केटसिटी मॉल कार्यान्वित झाला आणि आमच्या पोर्टफोलिओमध्ये एक रत्न म्हणून त्याने आपले स्थान प्रस्थापित केले. पुणेकरांनी खुल्या दिलाने आमच्या या मॉलचे स्वागत केले आणि शहराची एक नवी ओळख म्हणून फिनिक्स मॉलला स्थान निर्माण झाले. आज, अतिशय आनंदाने, आम्ही पुण्यातील आमचे दुसरे रिटेल डेस्टिनेशन, वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे अनावरण करत आहोत. हे नवीन रिटेल डेस्टिनेशन फिनिक्स मार्केटसिटी पुणेच्या उत्तुंग यशाचे प्रतिबिंब दाखवेल अशी अपेक्षा आहे. या मॉलमध्येही आम्ही ‘व्वा’ क्षणाचा अनुभव देण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाशी प्रामाणिक राहत, त्याची उभारणी केली आहे. याची आकर्षक रचना, ओपन रेस्टॉरंट्सची सुविधा अनोखा अनुभव देईल, यात शंका नाही. प्लाझा फ्लोरिश, रेन्स ऑफ नुरिश अट्रिया आणि ऑप्युलंट अॅट्रिअम अशा तीन विभागातील याची रचना कला आणि वास्तुकलेच्या अनोख्या मिलाफाचे दर्शन घडवते. क्रिडा आणि संगीताचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही येथे एक अनोखा इनडोअर फॅन पार्क तयार केला आहे. येथील सुंदर संगीत कारंजे आणि त्याच्या आजूबाजूची मोकळी प्रशस्त जागा आणि सुशोभित ठिकाणे मॉलच्या सौंदर्यात भर घालतात. इथला प्रत्येक मजला एक अनोखी कहाणी सांगतो. इथली सुंदर रचना इथला तुमचा प्रवास एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, याची ग्वाही देतात. या मॉलमध्ये असणारी बहुस्तरीय वाहन प्रवेश व्यवस्था सौंदर्यशास्त्राला पूरक असलेल्या नावीन्यपूर्णतेची प्रचिती देतात. पुणेकरांच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमचे हे नवीन आणि जागतिक दर्जाचे अत्याधुनिक रिटेल डेस्टिनेशन, वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, देखील त्यांच्या मनात स्थान निर्माण करेल आणि शहराच्या हृदयावर राज्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
द फिनिक्स मिल्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक शिशिर श्रीवास्तव म्हणाले, “वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणासारखे केंद्र इतरत्र तयार करण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. देशातील अशा रिटेल डेस्टिनेशन्सचे मालक, विकासक आणि व्यवस्थापक म्हणून आमचे स्थान मजबूत करतो. १२ लाख चौरस फूट भाडेतत्त्वावरील क्षेत्रासह आम्ही या विकासाची सुरुवात फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमद्वारे करत आहोत. याव्यतिरिक्त, आमच्याकडे १४ लाख चौरस फूट बांधकामाधीन, व्यावसायिक कार्यालयाची जागा आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या जागेचा वापर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.”
पुण्याच्या कानाकोपऱ्यांमधून आणि एक्स्प्रेसवेद्वारे जवळच्या शहरांमधून येथे येणे अतिशय सुलभ आहे. त्यामुळे हा मॉल या खरेदी, मनोरंजन आणि अनोख्या अनुभवाचे ठिकाण केंद्र ठरेल. हिंजवडी येथील आयटी आणि बायोटेक्नॉलॉजी पार्कच्या विकासासह मोठ्या निवासी संकुलांमुळे वाकड परिसरात गेल्या दशकात महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. पुणे ते नाशिक आणि अहमदनगरपर्यंत विस्तारलेल्या गोल्डन कॉरिडॉरवरील मोक्याच्या ठिकाणामुळे हे ठिकाण प्रादेशिक उपभोग केंद्र म्हणून प्रस्थापित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. सीपीपी इन्व्हेस्टमेंट्सबरोबरच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत कार्यान्वित होणारे हे आमचे दुसरे रिटेल डेस्टिनेशन आहे. इंदूरमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झालेले फिनिक्स सिटाडेल आमच्या संयुक्त उपक्रमातील होणारे पहिले रिटेल डेस्टिनेशन आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. आणखी एक उल्लेखनीय रिटेल डेस्टिनेशन साकारण्याच्या यशस्वी वाटचालीत सीपीपी इन्व्हेस्टमेंट्सने दिलेल्या सहकार्यासाठी मी त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो.
ग्राहकांचे खरेदीसाठीचे आवडते ठिकाण
या मॉलमध्ये ३५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये अनेक उंची, अलिशान प्रस्थापित ब्रॅंडससह पुण्यात प्रथमच पदार्पण करणाऱ्या अनेक नव्या ब्रँड्सचा समावेश आहे. पुरुष, महिला आणि मुलांसाठी कपडे, फॅशन अॅक्सेसरीज, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, पुस्तकांची दुकाने, खेळणी, सौंदर्य आणि वेलनेस सलून यासह अनेक विभागातील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ब्रँडस येथे उपलब्ध आहेत.
मॉलमधील प्रमुख १५ अँकर ब्रँडच्या श्रेणीमध्ये, एच अँड एम, लाइफस्टाईल, मार्क्स अँड स्पेन्सर, रिलायन्स ट्रेंडस, वेस्टसाइड, हॅमलेज, शॉपर्स स्टॉपसारख्या नामांकित ब्रँडसचा समावेश आहे. उल्लेखनीय नावे आढळू शकतात. त्यासह प्यूमा, तनिष्क, क्रोमा, स्केचर्स आणि होम ३६० यासह १० मिनी-अँकर ब्रँड्सही आहेत. याशिवाय फॉरएव्हर न्यू, चार्ल्स आणि कीथ, स्वारोवस्की, नौटिका आणि बुगाटी सारख्या १४ स्टार ब्रँडचाही समावेश आहे.
या मॉलच्या पूर्णवेळ संचालक आणि चीफ ऑपरेशन्स ऑफिसर रश्मी सेन, म्हणाल्या, “पुण्यासारख्या शहरात खरेदी आणि मनोरंजनाच्या अद्भूत केंद्राचे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे. फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमच्या उद्घाटनासह, आम्ही पुण्यातील आमच्या प्रिय ग्राहकांना आणखी एक अतुलनीय अनुभव देण्याच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल पुढे टाकले आहे. हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो रिटेल डेस्टिनेशनची नवी परिभाषा निर्माण करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करतो. या दूरदर्शी वचनाचे वास्तवात रूपांतर होत असल्याने, आमच्या रिटेल भागीदारांना त्यांच्या फ्लॅगशिप स्टोअर संकल्पना आमच्या जागतिक दर्जाच्या, नव्या युगातील रिटेल डेस्टिनेशनमध्ये साकारण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ३५० हून अधिक प्रसिद्ध देशांतर्गत आणि जागतिक रिटेल ब्रँड्सची ओळख करून देऊन, २५०० ब्रँड स्टोअरचे नेटवर्क विस्तारत आहोत आणि आमच्या देशव्यापी मॉल पोर्टफोलिओचे महत्त्व वाढवत आहोत. या मॉलचा कोपरानकोपरा आकर्षक असेल, यावर भर देण्यात आला आहे. मोहात पाडणाऱ्या ओपन-प्लॅन रेस्टॉरंट्सच्या आकर्षणापासून ते फॅन पार्कपर्यंत आणि १४ स्क्रिन असलेल्या शहरातील सर्वांत मोठ्या सिनेमागृहांनी या मॉलचे सौंदर्य खुलवले आहे.
आमच्या आकांक्षा स्थिर आहेत, आमचे उद्दिष्ट केवळ रिटेल मॉल्स उभारण्याचे नाही, तर रिटेल डेस्टिनेशन्सची नवी परिभाषा तयार करणे आणि त्याला जागतिक दर्जा देणे हे आहे. उत्कृष्टतेचा हा अथक ध्यास भौगोलिक सीमांच्या पलिकडचा आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये, आम्ही लखनौ, इंदूर आणि अहमदाबादमध्ये उभारलेल्या प्रत्येक अग्रगण्य रिटेल डेस्टिनेशनने आम्हाला या भौगोलिक मर्यादा ओलांडण्यास प्रवृत्त केले आहे. फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम हा आमचा नवीन उपक्रमही जागतिक स्तरावर ठसा उमटविणारे जागतिक दर्जाचे रिटेल अनुभव केंद्र निर्माण करण्याच्या साहसी भावनेचा आणखी एक पुरावा आहे.”
मनोरंजनाचे वैविध्यपू्र्ण स्थान
या मॉलमध्ये मनोरंजनाच्या वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत. अत्याधुनिक आणि वैविध्यपूर्ण मनोरंजनाच्या विविध पर्यायांसह सर्व वयोगटांसाठी योग्य असे डेस्टिनेशन म्हणून हा मॉल उदयास येत असून, जागतिक दर्जाचा अनुभव देण्यास सज्ज आहे. हे केवळ खरेदीचे आकर्षक स्थान नाही, येथे १.१० लाख चौरस फूट जागेवर पसरलेले एक विशेष मनोरंजन क्षेत्र याला वेगळे परिमाण देतो. या मॉलमध्ये २२०० लोक बसू शकतील, असा १४ स्क्रीनची सुविधा असलेला आयनॉक्स मेगाप्लेक्स आहे. याला पूरक म्हणून, “फॅन पार्क” नावाचे इनडोअर परफॉर्मन्स स्टेज मैफिली, लाइव्ह इव्हेंट्स, नाटक आणि इतर सादकरणांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. याव्यतिरिक्त, एक प्रशस्त कौटुंबिक मनोरंजन केंद्र, टाइमझोन आणि फनसिटी, हे एक इनडोअर मनोरंजन केंद्र मॉलच्या मनोरंजन क्षेत्रातील पर्याय अधिक समृद्ध करते.
फ्लेवर्सचा पुष्पगुच्छ
या पाच मजली मॉलमध्ये १९ अत्याधुनिक, स्वतंत्र ओळख असलेल्या फूड अँड बेव्हरेजेस ब्रँडची दालने आहेत. ही आउटलेट्स, स्थानिक आणि जागतिक स्तरावरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी देतात. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एक वेगळा अनुभव देतात. येथील उत्कृष्ट जेवणाची ठिकाणे आमच्या उच्च श्रेणीतील स्टोअर्सना पूरक आहेत. ग्राहकांची ही आवडती विश्रांतीची ठिकाणे आहेत. यामुळे मॉलचे आकर्षण वाढण्यास मदत होईल, आणि येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. याशिवाय, या मॉलमध्ये शहरातील सर्वांत मोठे ओअॅसिस फूड कोर्ट, ईशारा, पंजाब ग्रिल, कॅफे अलोरा, कॅफे पीटर, क्रेझी नूडल्स, कॉपर चिमनी, थर्ड वेव्ह कॉफी आणि ब्लू टोकाई यांसारखी नामांकित रेस्टॉरंट्स आहेत. अतिशय आकर्षक रचना आणि उत्तम दर्जेदार खाद्यपदार्थ, जेवण देणारी ही रेस्टॉरंट्स ग्राहकांना आनंददायी अनुभव देतात.
भविष्यकालीन खरेदीसंस्कृतीचे प्रतीक
या मॉलमध्ये समकालीन आणि भविष्यकालीन वास्तुकलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. त्यामुळे निर्माण झालेले वातावरण आधुनिकतेचे दर्शन घडविते. प्लाझा फ्लोरिश, रेन्स ऑफ नुरिश अट्रिया आणि ऑप्युलंट अॅट्रिअम या तीन वैशिष्ट्यपूर्ण तीन रचनांनी मॉलच्या आतील भागाला वेगळेच सौंदर्य बहाल केले आहे. या भागातील डिझाइनमध्ये साधेपणा आणि आधुनिक सौंदर्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो. “कनेक्टिव्हिटी” ही मध्यवर्ती संकल्पना असलेले इथली डिझाइन अत्याधुनिक घटकांनी परिपूर्ण आहेत. फाउंटन प्लाझा नावाचे मंत्रमुग्ध करणारे म्युझिकल फाउंटन एक लक्षवेधक ठळक ठिकाण म्हणून प्रस्थापित होत आहे. उत्कृष्ट सुनियोजित रचना असलेला हिरवाईने वेढलेला आणि आकर्षक आर्ट-डेको इंस्टॉलेशन असलेल्या प्लाझा फ्लोरिश अॅट्रिअमची भव्यता नजर खिळवून ठेवते. येथे असलेले डायमंडच्या आकाराचे लाईटस् आणि भव्य एलईडी स्क्रीन्सने सुशोभित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भिंती सर्वांना मंत्रमुग्ध करतात. ग्राहक मॉलमध्ये फिरत असताना, सर्व वयोगटातील व्यक्तींना आकर्षित करेल असे भव्य डिझाइन जागतिक दर्जाचे, नव्या युगातील रिटेल डेस्टिनेशन मूर्त रूपात साकारते.
पर्यावरणसंवर्धनासाठी जबाबदार वृत्ती
फिनिक्स मिल्स लि. ने अधिक शाश्वत जागतिक लँडस्केपच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी प्रभावशाली प्रेरक शक्ती म्हणून स्थान निर्माण केले आहे. शहरातील १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास तयार आहे. याबाबतच्या आमच्या वचनबद्धतेचा हा पुरावा आहे. आमच्या कॉर्पोरेट जबाबदारीच्या अनुषंगाने, मॉल पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जाते. वापरण्यात आलेले सर्व साहित्य आणि विकसित झालेली जागा पर्यावरणपूरक तत्त्वांशी सुसंगती दर्शवितात आणि टिकाऊपणाचे कठोर निकष पूर्ण करतात. येथे पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली विचारपूर्वक पाच मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. १.५ टन कचऱ्याचे विघटन करणारी ऑर्गेनिक वेस्ट कन्हर्वटर यंत्रणा या मॉलमधील हिरव्या परिसराला पाणी आणि खत दोन्ही देते.
