येत्या रविवारी “पुणे ऑन पॅडल्स” या भव्य सायकल रॅलीचे आयोजन
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुणे ऑन पॅडल्स या भव्य सायकल रॅलीचे आयोजन माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिनांक १७ सप्टेंबर रविवारी, सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड या ठिकाणी आयोजन केले आहे. सदरील सायकल रॅलीसाठी प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त पुणेकरांनी यामध्ये सहभागी व्हावे सहभाग होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मेडल, एक टी-शर्ट, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल.
प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, धीरज घाटे शहर अध्यक्ष भाजपा, अभिनेत्री अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला फेम यांच्या शुभहस्ते या रॅलीचा फ्लॅग ऑफ होणार आहे. तसेच फिटनेस क्षेत्रातील दिग्गज गजानन खैरे, अजित पाटील, दिग्विजय जेधे, अजय देसाई , लहू उघडे, सुविधा कडलग, अंजली भालिंगे , डॉ. ओंकार थोपटे , गगन ग्रोव्हर , रवी नागणे निलेश मिसाळ, मारुती गोळे , सुनील कुकडे, प्रीती मस्के, कल्याणी टोकेकर, शंकर गाढवे, राहुल नलावडे, बाळकृष्ण नेहरकर, आनंद कंसल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली.