Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ६०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या शिबीरात महाराष्ट्रातील तब्बल ६०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम सातत्याने सुरु असून महाराष्ट्राच्या विविध शहरांतून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबीरासाठी पुण्यात आले होते.

पिनॅकल इंडस्ट्रीज, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय कृत्रिम अंग निर्वाण निगम (अ‍ॅलिम्को) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील रासने म्हणाले, जय गणेश रुग्णसेवा अभिनायाच्या माध्यमातून २८ हजार हून अधिक गरजू रुग्णांना श्रवणयंत्र देण्यात आले आहेत.सातत्याने विविध शिबीरे आणि सुविधांचा रुग्णांना लाभ होत असून समाजाच्या तळागाळात पोहोचण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. नुकतेच मोफत महाआरोग्य शिबीरात देखील हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली. कानाच्या विकारांप्रमाणेच विविध आजार, कृत्रिम अवयव यांसह सर्व प्रकारची वैद्यकीय मदत ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply