मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण
पुणे ; मराठा समाजाला आरक्षण द्यावे , जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे आज गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हुतात्मा बाबू गेनू चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले
मनोज जरंगे यांनी जालना येथे पुकारलेल्या आंदोलनाला यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात पाठिंबा दिला
आज दुपारी 2 वाजता श्रावणी मेमाणे या मुलीच्या हस्ते मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक श्रुतिका पाडळे व अन्य कार्यकर्त्यांना लिंबू रस पाजून उपोषण सोडण्यात आले
न्यायालयात टिकेल अश्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे जरंगे यांनी केलेल्या मागण्या विषयी राज्य सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा जालना येथे जरंगे याना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर अमानुषपणे पोलिसांनी लाठीमार केला त्याची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी आदी मागण्यासाठी आज सकाळी 10 वाजता हुतात्मा बाबू गेनू चौकात समन्वयक राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब आमराळे युवराज दिसले आदींच्या मार्गदर्शनाखाली 150 ते 200 कार्यकर्त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला
यावेळी बाळासाहेब आमराळे, राजेंद्र कुंजीर, अमर पवार, गुलाबराव गायकवाड, तुषार काकडे, युवराज दिसले,सचिन वडघुले,गणेश मापारी,नाना निवगुणे,सचिन आडे कर,रेखा कोंडे,मिलन पवार,संदीप लहाने अनिकेत भगत, राकेश रेपाळे आदी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देणारी भाषणे केली
यावेळी 1 महिन्यात योग्य व सकारात्मक पद्धतीने निर्णय न झाल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशारा देण्यात आला