Saturday, June 20, 2026
Latest NewsSports

आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत राज्यभरातून 550 खेळाडू सहभागी  


पुणे :  पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटना आणि महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत राज्यांतील विविध जिल्ह्यांतून एकूण 550  खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा महाराष्ट्र स्क्वॅश अकादमी आणि इव्हॉल्व्ह स्क्वॅश कोर्ट, एनआयबीएम रोड येथे 8 ते 11 सप्टेंबर 2023 या कालावधीत रंगणार आहे.
 

महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांडरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेच्या वतीने एन. आय.बी.एम. रोड, उंड्री, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची महाराष्ट्र स्क्वॅश अॅकेडमी ची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील प्रथम व आशिया खंडातील द्वितीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ३ ग्लास स्क्वॅश कोर्ट उभारण्यात आले आहे. या अकादमी मार्फत महाराष्ट्रातील स्क्वॅश खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक व प्रशिक्षण शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येणार असून यामुळे स्क्वॅश खेळामध्ये देशाचे व महाराष्ट्राचे नाव लौकीक करण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. स्पर्धेला रुबाबदार यांचे प्रायोजकत्व लाभले असुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ३ ग्लास स्क्वॅश कोर्ट उभारण्यात एसर स्पोर्टस फ्लोअर इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. 


पुणे जिल्हा स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव ऍडव्होकेट आनंद लाहोटी यांनी सांगितले की,  या स्पर्धेत पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, नागपुर, जळगाव, अकोला, अमरावती, रायगड, सांगली, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, वाशीम, जालना, वर्धा, धुळे, नांदेड, सातारा, पालघर, बीड या ठिकाणाहून एकूण 550 प्रवेशिका आल्या आहेत.

तसेच, हि स्पर्धा 11, 13, 15, 17, 19 वर्षाखालील मुले व मुली, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी गटात पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक व गुण देण्यात देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे आम्हांला आनंद झाला असल्याचे लाहोटी यांनी नमूद केले.  स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये आनंद लाहोटी, कालीदास मगर, कुमान सिंग भाटी, नितेश पोतदार, हिम्मत सिंग आणि प्रियांका मंत्री यांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading