डॉ. मुकेश बत्रा यांच्या ‘व्हिस्पर्स ऑफ द व्हॅली’ फोटो प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई : प्रख्यात होमिओपॅथ पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांच्याद्वारे दिलीप पिरामल आर्ट गॅलरी, एनसीपीए, मुंबई येथे ५२व्या फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. खासदार व प्रतिष्ठित भारतीय अभिनेते श्री. शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘व्हिस्पर्स ऑफ द व्हॅली’ नाव असलेल्या या फोटो प्रदर्शनामधील फोटोंमध्ये भारतातील सर्वात नयनरम्य स्थळ काश्मीरच्या अद्भुत परिदृश्यांना कॅप्चर करण्यात आले आहे. यामध्ये नयनरम्य डाल लेक ते भव्य हिमालय पर्वताचा समावेश आहे. प्रत्येक फोटोमधून प्रदेशाच्या नैसर्गिक सौंदर्याचे विभिन्न पैलू दिसून येतात.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मश्री डॉ. बत्रा यांचे त्यांच्या उल्लेखनीय फोटोंसाठी अभिनंदन केले. या फोटोंमध्ये डॉ. बत्रा यांनी काश्मीरचे अप्रतिम सौंदर्य व गजबजलेले मुंबई शहर कॅप्चर केले आहे. हे प्रदर्शन अधिकाधिक पर्यटकांना काश्मीरला भेट देण्यास प्रेरित करेल आणि स्थानिकांच्या उदरनिर्वाहामध्ये वाढ करण्यास मदत करेल. त्यांनी दृष्टीरहित व्यक्तींना पाठिंबा देण्याच्या कार्यासाठी पद्मश्री डॉ. बत्रा यांचे कौतुक केले.
डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “मला माझ्या फोटोग्राफी कौशल्याचा वापर करत मुंबईकरांना काश्मीरच्या सौंदर्याचा अनुभव देण्याचा आनंद होत आहे. गेल्या आठवड्यात कला व सांस्कृतिक विभाग, दुबई सरकारचे प्रायोजकत्व व निकॉन-एमईएचे सह-प्रायोजकत्व असलेल्या दुबईमधील माझ्या आंतरराष्ट्रीय फोटो प्रदर्शनानंतर मला माझ्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून काश्मीरचे सौंदर्य दाखवण्याचा आनंद होत आहे. तसेच मला आनंद होत आहे की, या प्रदर्शनामुळे दृष्टीरहित व्यक्तींना मदत होणार आहे, ज्यांना आम्ही गेल्या चाळीस वर्षांपासून साह्य करत आहोत.”
दिग्दर्शक पहलाज निहलानी, झायेद खान, पूजा बेदी, मिकी मेहता, रूप कुमार राठोड आणि इतर अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला उपस्थिती दाखवली. हे प्रदर्शन दिलीप पिरामल आर्ट गॅलरी, एनसीपीए, नरिमन पॉइण्ट, मुंबई येथे ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटनीय इव्हेण्टचे आयोजक दिलीप पिरामल म्हणाले, “मी डॉ. बत्रा यांना सुप्रसिद्ध होमिओपॅथ म्हणून ओळखतो आणि फोटोग्राफर म्हणून त्यांचे कौशल्य पाहून भारावून गेलो आहे. ते माझ्या गॅलरीमध्ये या प्रतिष्ठित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत, याचा मला सन्मान वाटतो.”