fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

आदित्य L1 नेमकं कुठे लँड होणार आहे?

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता भारताने आदित्य L1 (Aditya L1) ही मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी 11 वा. 50 मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचं आदित्य L1 (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 (Aditya L1) ही मोहीम भारताने सुरू केली आहे. मात्र हे यान सूर्यावर जाणार नाही. तर हे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये एका ठरावीक बिंदूवर म्हणजेच L 1 या बिंदूवर जावून स्थिरावणार असून तेथून सूर्याचा अभ्यास करणार आहे. या बिंदूवर पोहोचण्यासाठी आदित्य L1 (Aditya L1) ला जवळपास चार महीने प्रवास करावा लागणार आहे.

L 1 म्हणजे काय ?

पृथ्वी पासून सूर्य हा 150 मिलियन किमी अंतरावर आहे. तर आदित्य L1 (Aditya L1) हे यान पृथ्वी पासून 1.5 मिलियन किमी अंतरावर जावून स्थिरावणार आहे. त्या बिंदूला L 1 असे नाव देण्यात आले आहे. या बिंदूवर पृथ्वी आणि सूर्याच गुरूत्वाकर्षण हे समसमान आहे. त्यामुळे आदित्य L1 (Aditya L1) हे या बिंदूवर जावून स्थिर होवू शकते. थोडक्यात L 1 एक पार्किंग spot आहे.  अंतराळात असे पाच बिंदू आहेत.

यापूर्वी नासाने L 2 या बिंदू James Webb Space Telescope स्थापित करण्यात आले आहे.  L 3 हा बिंदू  सूर्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे तेथे पोहोचणे खूप अवघड आहे. तर L 4 आणि L 5 हे बिंदू स्टेबल पॉइंट म्हणून ओळखले जातात. अंतराळात फिरत असलेल्या वस्तू येथे येवून स्थिर होतात. अन् येथून त्यांना हलवणं खूप अवघड असतं.

चंद्रयान 3 आणि आदित्य L1 (Aditya L1) यामध्ये काय समानता आहे ? 

  • चंद्रयान 3 आणि आदित्य L1 (Aditya L1) यानांना लॉंच करण्याची पद्धत एकच आहे. ही दोन्ही यान पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरत नंतर ठरलेल्या स्थळी पोहोचणार आहेत.
  • चांद्रयान 3 चा विचार केला तर आदित्य L1 (Aditya L1) हे चार पट अधिक अंतर पार करणार आहे.
  • चंद्रयान 3 कोठे लॅंडींग करणार हे आपल्याला माहीत होतं. मात्र, आदित्य L1 (Aditya L1) ठरलेल्या बिंदूवर स्थिर करणं हे आव्हानात्मक असणार आहे.
  • चंद्रयान 3 चंद्रावर रात्र झाल्यावर म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांनंतर काम करणार की नाही? याबाबाद शंका आहे. तर आदित्य L1 (Aditya L1) पुढील पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार आहे. पण ठरलेल्या L1 बिंदूवर कायम राहण्यासाठी आदित्य L1 ला दर 23 दिवसांनी आपल्या प्रोग्रामिंगमध्ये बदल करावा लागणार आहे.

आदित्य L1 मोहीम हाती घेण्याचे कारण ? 

सूर्य हा पृथ्वीच्या जवळचा सर्वात मोठा आणि महत्वाचा तारा आहे. त्यामुळे इतर कोणत्या ताऱ्याचा अभ्यास करण्यापेक्षा ISRO ला सूर्याचा अभ्यास करण तुलनेने सोपे आणि कमी खर्चीक आहे. सूर्याच्या प्रकाशाचा पृथ्वीवरील अनेक गोष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे सूर्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडे पर्यंत काही मिनिटं लागतात. सूर्याच्या भोवताली सात आवरण आहेत. आदित्य L1 या  मोहिमे अंतर्गत यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: