fbpx
Monday, October 2, 2023
BusinessLatest News

शक्ती पंप्सला हरियाणामध्ये मिळाली ३५० कोटी रुपयांची वर्क ऑर्डर

मुंबई: सौर पंपिंग सोल्यूशन्समधील अग्रगण्य असलेल्या शक्ती पंप्सने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. कंपनीला हरियाणातील हरित ऊर्जा विकास एजन्सी (HAREDA) कडून 350 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. हरेडाने सुरू केलेल्या महत्त्वाच्या कुसुम योजना-३ अंतर्गत ही वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे.
शक्ती पंप चे अध्यक्ष श्री दिनेश पाटीदार म्हणाले की, हरियाणातील शेतकरी आणि हरेडा टीमने विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. या प्रयत्नातून शेतकरी सौरऊर्जेचा वापर करून पाणी आणि विजेची बचत करण्याबरोबरच सूक्ष्म सिंचनाच्या मदतीने शेतीत आणखी वाढ साधू शकतात. हा प्रयत्न शक्ती पंप्सच्या पर्यावरणीय शाश्वततेच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने असून यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात.
शक्ती पंप सातत्याने नावीन्य आणि उत्कृष्टतेमध्ये आघाडीवर आहे. कुसुम योजना फेज-१ आणि फेज-२ साठी पंपांचे पुरवठादार असण्यासोबतच फेज-३ साठी  शेतीत नवीन बदल घडवण्यासाठी शेतकरी शक्ती कंपनीची निवड करतात. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शक्ती पंप्सने हरियाणामध्ये १३,००० हून अधिक पंप स्थापित केले असून या क्रमाने आणखी ७७०० पंप जोडले जातील.कुसुम योजनेच्या माध्यमातून सौरपंप बसवून भारतीय कृषी जगतात नवीन पर्व सुरू झाले आहे. सौर पंप तंत्रज्ञानाचा अवलंब करून, शेतकरी आनंदी दिसत आहेत आणि आम्हाला या उपक्रमाचा एक भाग असल्याचा आनंद होत आहे. शक्ती पंप्स कुसुम योजना-३ च्या माध्यमातून एक नवीन परिवर्तन सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे भारतीय शेतकरी नवीन तंत्रज्ञानाद्वारे भारताला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख देईल.

सौर पंपिंग सोल्यूशन्समध्ये शाश्वत नवकल्पना आणि विश्वासार्हतेबरोबर शक्ती पंप पर्यावरण संवर्धनासाठी आघाडीवर आहे. सौर पंप तंत्रज्ञानाद्वारे कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्यात कंपनी आघाडीवर आहे. शक्ती पंपांचे सर्व सबमर्सिबल पंप स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत, जे उत्पादनातील नवीनतम तंत्रज्ञान आणि गुणवत्तेचा पुरावा आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, शक्ती पंप्सला भारतातील पहिली -स्टार रेटेड पंप उत्पादक कंपनी म्हणून गौरव प्राप्त झाले आहे. तसेच जगभरातील १२५ हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात केली आहेत. स्वतःचे सौर पंप, मोटर्स, स्ट्रक्चर्स आणि कंट्रोलर तयार करणाऱ्या एकमेव कंपनी शक्ती पंप्सने २८ पेटंटसाठी अर्ज केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: