fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारताचे आदित्य L1 (Aditya L1) सूर्याकडे झेपावले

श्रीहरीकोटा : चांद्रयान 3 या यशानंतर आता भारताने आदित्य L1 (Aditya L1) ही मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी 11 वा. 50 मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचं आदित्य L1 (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. चांद्रयान 3च्या यशामुळे यापूर्वीच भारताचे जगभरात कौतुक होत आहे. त्यामुळे आदित्य L1 (Aditya L1) मोहिमेकडे देखील भारतासह जगाचे लक्ष लंगले आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 (Aditya L1) भारताने ही मोहीम सुरू केली आहे. मात्र हे सूर्यावर जाणार यान नाही. तर हे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये एका ठरावीक बिंदूवर म्हणजेच L 1 या बिंदूवर जावून स्थिरावणार असून तेथून सूर्याचा अभ्यास करणार आहे. या बिंदूवर पोहोचण्यासाठी आदित्य L1 (Aditya L1) ला जवळपास चार महीने प्रवास करावा लागणार आहे.

L 1 म्हणजे काय ?

पृथ्वी पासून सूर्य हा 150 मिलियन किमी अंतरावर आहे. तर आदित्य L1 (Aditya L1) हे यान पृथ्वी 1.5 मिलियन किमी अंतरावर जावून स्थिरावणार आहे. त्या पॉइंटला L 1 असे नाव देण्यात आले आहे. या बिंदूवर पृथ्वी आणि सूर्याच गुरूत्वाकर्षण हे समसमान आहे. त्यामुळे आदित्य L1 (Aditya L1) हे या बिंदूवर जावून स्थिर होवू शकते.

Leave a Reply

%d