fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNESports

क्रिमसन अनिशा ग्लोबल स्कूल येथील अत्याधुनिक बॅटमिंटन कोर्टचे पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : क्रिमसन अनिशा ग्लोबल स्कूलला आपल्या दुहेरी अत्याधुनिक बॅटमिंटन कोर्टांच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याची शाळेची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

क्रिमसन अनिशा ग्लोबल स्कूलला  पुलेला गोपीचंद यांनी स्थापन केलेल्या बॅडमिंटन गुरूकुलसह एकत्र येताना आनंद होत असून त्यांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच जागतिक दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होईल. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची व त्यांच्यात शिस्त, जिद्द आणि चिकाटीसारखे गुण रूजवण्यावर असलेला आमचा भर दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार असून त्यांना आपली खेळाची आवड सहजपणे जोपासता येईल. ही भागिदारी आमच्या विद्यार्थ्यांना अगणित शक्यतांच्या भविष्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम करेल.

कोलते- पाटील डेव्हलपर्स यांनी विकसित केलेल्या लाइफ रिपब्लिक या सर्वसमावेशक टाउनशीपमध्ये वसलेल्या शाळेच्या परिसरात २ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणेपदी भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक, ऑलिंपिक खेळाडू आणि बॅडमिंटन गुरुकुलचे प्रमुख मार्गदर्शक पद्मभूषण पुलेला गोपीचंद आणि राजेश पाटील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोलते पाटील डेव्हलपर्स लि उपस्थित होते.

बॅडमिंटन क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व पुलेला गोपीचंद हे अनुभवसंपन्नता, ज्ञान आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. त्यांची उपस्थिती शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण विकसित करण्यासाठीची बांधिलकी अधोरेखित करणारी आहे.

क्रिसन अनिशा ग्लोबल स्कूल आणि बॅडमिंटन गुरुकुल यांच्यातील भागिदारी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. दुहेरी, अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट्सच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना पुढील लाभ होतील –

  1. जागतिक- दर्जाचे मार्गदर्शन–  पुलेला यांच्या मार्गदर्शनाच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांचे बॅटमिंटन कौशल्य व तंत्र सुधारण्याची संधी मिळले.
  2. व्यावसायिक प्रशिक्षण– क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून प्रशिक्षण घेतलेली व्यावसायिक टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यामुळे त्यांना स्पर्धात्मक बॅडमिंटनसाठी आवश्यक कठोर मेहनत व शिस्तीचे धडे मिळतील.
  3. सर्वांगीण विकास: या भागिदारीमुळे सर्वांगीण शिक्षणाप्रती शाळेची बांधिलकी, मुलांचा शैक्षणिक तसेच क्रीडा गुणवत्तेचा विकास करण्यावर असलेला भर दिसून आला आहे.
  1. शारीरिक स्वास्थ्य– नियमितपणे बॅटमिंटनसारख्या खेळाचे कठोर प्रशिक्षण घेण्यातून मुलांचे शारीरिक व एकंदरीत स्वास्थ्य उंचावण्यास मदत होईल.
  2. शैक्षणिक गुणवत्ता: खेळात भाग घेण्यातून शैक्षणिक कामगिरी उंचावत असल्याचे विविध संशोधनातून दिसून आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन उंचावेल.

उद्घाटनपर कार्यक्रमाचे वातावरण उत्सुकता व प्रेरणेने भारलेले होते. यावेळी शाळेचे अधिकारी व  पुलेला गोपीचंद यांनी फीत कापली तसेच प्रोत्साहनपर भाषण केले. पालकांना मान्यवरांशी भेटण्याची संधी मिळाली तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. पुलेला गोपीचंद यांना काही तंत्रे व सोपे ट्रिक शॉट्स शिकवताना पाहाण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारा होता. या खेळाविषयी त्यांनी व्यक्त केलेले अनुभव मुलांना त्यांचा बॅडमिंटनचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रेरणा देणारा होता.

‘या नव्या बॅडमिंटन कोर्टाचे अनावरण करताना आपण शिक्षण व खेळ यांचा मिलाफ साधणाऱ्या, यश मिळवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या व्यक्ती घडवणाऱ्या मार्गाची सुरुवात करत आहोत,’ असे पुलेला भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक, ऑलिंपिक खेळाडू आणि बॅडमिंटन गुरुकुलचे प्रमुख मार्गदर्शक पद्मभूषण म्हणाले.

‘या नव्या बॅडमिंटन कोर्टाच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी अगणित शक्यतांच्या जगात प्रवेश करत आहेत, जिथे ध्यास आणि सातत्यातून स्वप्ने खरी होतात,’ असे क्रिमसन एज्युकेशनचे मुख्य कार्यकारी  हुसैन दोहदवाला म्हणाले.

‘क्रिमसन एज्युकेशन आणि बॅडमिंटन गुरुकुल यांच्यातील भागिदारी शिक्षण व खेळाचा मेळ घालणाऱ्या नव्या युगाकडे नेणारी आहे. सर्वांगीण विकास साधण्याची, शिस्त रूजवण्याची आणि विद्यार्थ्यांना कोर्ट व कोर्टाच्या बाहेर गुणवत्तेचा ध्यास धरण्याची आमची सामाईक विचारधारा यातून उठून दिसत आहे,’ असे बॅडमिंटन गुरुकुलच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुप्रिया देवगण म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: