fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले

मुंबई : मुंबईमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे. या बैठकीसाठी २८ पक्षांचे ६३ नेते मुंबईत उपस्थित आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर दुपारी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे आहे. काही पक्ष नव्याने सहभागी झाले असून त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जहानर आहे. त्यामुळे तूर्तास तरी लोगोचे अनावरण होणार नाही.

गुरुवारी काही नेते उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्यांशी याबाबत मंथन झालेले नाही. इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यातील एका डिझाईनला काही महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे. अंतिम झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलक दिसणार आहे.

या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.

सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d