fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

बोपोडी – संविधान चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु भाजपच्या आंदोलनाला यश

पुणे : बोपोडी ते संविधान चौक हा रस्ता आज पासून सुरु करण्यात आला आहे. या मार्गावर दुहेरी वाहतूक सुरु व्हावी यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार सर्वात आधी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने व मा.नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. आज हा रस्ता सुरु झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीत सापडलेल्या औध, औंध रोड, बोपोडी, खडकी चिखलवाडी येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे.

हा रस्ता सुरु व्हावा यासाठी भाजपच्या वतीने गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पुणे मेट्रोच्या पिंपरी – चिंचवड ते शिवाजीनगर या उन्नत मार्गासाठी बोपोडी ते संविधान चौक या मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात येणार असल्याच्या कारणावरून, बोपोडी ते संविधान चौक या मार्गावर प्रशासनाकडून वाहतूक एकेरी करण्यात आली होती. त्यातच पुणे विद्यापीठ रस्त्यावर मेट्रो आणि दुहेरी उड्डाणपुलाची कामे सुरु असल्याने पर्यायी रस्ता म्हणून औंध रोडचा वापर वाढला होता. यामुळे औंध रोड, खडकी, खडकी स्टेशन परिसरात वाहतूक वाढली होती. अवजड वाहतूकही या मार्गाने सुरु झाल्याने रस्त्यात खड्डे पडले होते. तसेच रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले होते. वाहतूक कोंडीमुळे लोकांचा बहुमुल्य वेळ वाया जात होता. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना ही त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना होणाऱ्या या नाहक त्रासामुळे या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरु करावी अशी मागणी वारंवार महापालिका, वाहतूक पोलीस तसेच मेट्रो प्रशासनाकडे केली होती. मात्र वारंवार निवेदन देऊनही या बाबत सकारात्मक तोडगा निघत नसल्याने भाजपाच्या वतीने सुनील माने व प्रकाश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग सुरु झाला आहे. या मार्गावर बोपोडी येथे मेट्रो स्टेशन करण्यात आले आहे. मात्र बापोडी मधून दुहेरी वाहतूक सुरु नसल्याने बोपोडी, औंधरोड तसेच चिखलवाडी येथून बोपोडी मेट्रो स्टेशनकडे येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हा मार्ग दुहेरी करणे गरजेचे होते. प्रशासनाने हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने याचे लोकांकडून स्वागत होत आहे.

Leave a Reply

%d