fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची घोषणा

मुंबई : देशभरातील २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक सुरु आहे. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीतीतुन एक महत्त्वाची बातमी समोर आली असून या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे.

समन्वय समिती
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम. के. स्टॅलिन, आरजेडीचे तेजस्वी यादव, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, जावेद अली खान, लल्लन सिंह, डी राजा आणि उमर अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा या समन्वय समितीत समावेश असणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: