fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची बिनविरोध निवड

पुणे  : प्रसारमाध्यमांतील पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची निवड करण्यात आली.

विभागीय माहिती कार्यालय पुणे येथे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस समितीचे सदस्य गोरख तावरे, अमन सय्यद, चंद्रसेन जाधव, सुनित भावे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ नुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.  पाटणे हे सातारा येथे  पुढारीचे आवृत्ती प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. प्रारंभी उपसंचालक (माहिती) डॉ. पाटोदकर यांनी उपस्थित समिती सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  पाटणे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: